PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

PM Kisan Dharashiv News : पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्यात धाराशिवमधील २,५८८ शेतकरी वगळले गेले. ई-केवायसी अपूर्ण, आधार पडताळणी आणि बँक लिंकिंग समस्येमुळे शेतकरी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

PM Kisan Yojna eKYC Dharashiv News : धाराशिवमध्ये पीएम किसान सन्मान योजनेचा २१ वा जमा झालाय. मात्र या योजनेतून धाराशिव जिल्ह्यातील 2588 शेतकरी वगळले. कठोर झालेल्या e-KYC, आधार पडताळणी आणि बँक लिंकिंग निकषांमुळे शेतकरी योजनेतून वगळले गेलेत.

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत पाञ शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपयांचा निधी मिळतो माञ 20 वा हप्ता दिल्यानंतर लागु करण्यात आलेल्या काटेकोर निकषामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 हजार 588 शेतकरी अपाञ ठरले आहेत.प्रामुख्याने ई केवायसी प्रक्रीया अपुर्ण ठेवल्याने,तसेच बॅंक खाते आधार कार्डशी व जोडल्याने व कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही लाभार्थी संख्या कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com