Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

Nagpur winter session, Maharashtra assembly session : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून विरोधक पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
Nagpur Winter Session Begins
Nagpur Winter Session BeginsCMO
Published On
Summary
  • नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.

  • विरोधक सरकारविरोधात हल्लाबोल करणार.

  • पहिल्याच दिवशी चार प्रमुख मोर्चे, 15 धरणे आंदोलन आणि आत्मदहनाचा इशारा.

  • शहरभर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात.

Nagpur Winter Session News : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालना नागपुरात आजपासून सुरूवात होत आहे, हिवाळी अधिवेशनात पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आजपासून १४ डिसेंबरदरम्यान होणारे विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारच्या बाजूनेही तोडीस तोड उत्तर देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पहिल्याच दिवशी ४ मोर्चे धडकणार

उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार आहेत. तर यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनाचे 15 धरणे आंदोलन आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दोघांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार प्रमुख मोर्चे विधानसभेच्या दिशेने कूच करणार आहेत.

Nagpur Winter Session Begins
नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

मोर्चेकऱ्यांवर कॅमेऱ्याची नजर -

विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला असताना दुसऱ्या बाजूने जनतेच्या मागण्याचा आगडोंब उसळणार असल्याचे चित्र आहे. नागपूर शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात, वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याशिवाय चौकातील कॅमेऱ्याची नजर असेल सोबतच ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेऱ्याची नजर असेल.

Nagpur Winter Session Begins
PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

उपराजधानी हायअलर्टवर -

ऑपरेशन सिंदूर नंतर Jaish-e-Mohammad कडून घातपाताचा धोका वाढल्याचा गुप्तचर यंत्रणांकडून इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उपराजधानी नागपूर हायअलर्टवर आहे. हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर महालमधील RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक ठिकाणे गर्दीच्या जागांवर उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर ठेवण्यात आली आहे.

Nagpur Winter Session Begins
Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

AI ची नजर

विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त, मुख्य स्थळांची बॉम्बशोधक नाशक पथकांकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे. CCTV, आणि AI-आधारित नजर ठेवणीद्वारे संवेदनशील परिसराची सतत मॉनिटरिंग केले जात आहे. हिवाळी अधिवेशनासाठी फोर्स वन तुकड्या नागपूरात तैनात, राज्यातील विविध जिल्ह्यांतील अतिरिक्त 3 हजारावर पोलिस अधिकारीकर्मचारी दाखल झाले आहेत. SRPF च्या ५ तुकड्या, होमगार्डसह एकूण 10 हजार पोलिसांची उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.

Nagpur Winter Session Begins
Gold Price Today : मुंबई-पुण्यात सोन्याच्या किंमतीत झाली घसरण, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com