

पीएम किसानचा २२ वा हप्ता डीबीटी सक्रिय नसल्यास अडकणार
एका चुकीमुळे अनेक शेतकऱ्यांचे २००० रुपये खात्यावर जमा होत नाहीत
डीबीटी संमती फॉर्म आणि आधार सीडिंग फॉर्म बँकेत भरावा लागतो
खाते NPCI मॅपरशी लिंक झाल्यानंतरच शासकीय DBT रक्कम जमा होते
Why PM Kisan 22nd installment is not coming in bank accounts : शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. लहान शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा व्हावा, यासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली जाते. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना हा त्याचाच एक भाग आहे. या योजने अंतर्गत देशात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रूपये जमा केले जातात. वर्षातून तीन वेळा प्रत्येकी २००० - २००० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. जेशातील शेतकरी २००० रूपयांकडे डोळे लागून आहेत. पण काी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता पोहचणार नाही. शेतकर्यांना आपलं काय चुकले याबाबत समजलेही नाही. तुम्ही अथवा तुमच्या ओळखीचा कुणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. एक छोटी चूक तुम्हाला या योजनेतून अपात्र करू शकते. पाहूयात कोणत्या चुकीमुळे २२ वा हप्ता रखडला जाऊ शकतो.
पीएम किसान योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्या बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) सक्रिय असणं अनिवार्य आहे. सरकार शेतकर्यांचे हप्ते डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात पाठवते. पण जर तुमच्या खात्यात डीबीटी सक्षम नसेल किंवा तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. बँकेत डीबीटी सक्रिय न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे उशिराने जमा होत आहेत.
पीएम किसान योजनेचे खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जावा. तुम्हाला डीबीटी संमती फॉर्म आणि आधार सीडिंग फॉर्म भरावा लागेल. हे फॉर्म बँकेत उपलब्ध आहेत.
फॉर्म भरल्यानंतर, बँकेला तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करण्याची विनंती करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागू शकते. बँक तुमचे पासबुक देखील मागू शकते. त्यामुळे पासबुक घेऊनच बँकेत जा.
तुमच्या बँक खात्यावर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा. यामुळे तुमच्या खात्यावर होणाऱ्या सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
तुमचा आधार लिंक केल्यानंतर, तुमची बँक तुमचे खाते NPCI मॅपरशी लिंक करेल. यामुळे सर्व सरकार-प्रायोजित DBT ट्रान्सफर थेट तुमच्या खात्यात जमा होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.