Social Media Ban: भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणार? नेटकरी काय म्हणतात वाचा

Australia News: ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्ण बंदी लागू केल्यानंतर भारतातही अशीच मागणी वाढली आहे. सोनू सूदच्या पोस्टनंतर नेटकरी यावर दोन गटात विभागले गेले आहेत.
social media ban
social media bangoogle
Published On

सध्या लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलची आणि त्यात सोशल मीडिया वापरण्याची सवय झाली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने एक मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे ऑस्ट्रेलियात या पुढे 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी लागू केली आहे. मंगळवारपासून देशभरात TikTok, YouTube, Instagram आणि Facebookअशा 10 मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर मुलांची एंट्री पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. हा निर्णय जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

भारतातही अशीच मागणी जोर धरत आहे. दरम्यान, भारतात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही हा मुद्दा उचलत सरकारने ऑस्ट्रेलियासारखा नियम लागू करावा, अशी मागणी केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली असून नेटकरी दोन गटात विभागलेले दिसतात.

social media ban
Thursday Horoscope : कामात यश, संकटांचा सामना; कसा जाणार १२ राशींचा गुरुवार? वाचा राशीभविष्य

काहींचं म्हणणं आहे की, ''भारतातही मुलांना सोशल मीडिया वापरावर नियंत्रण हवं, नाहीतर मानसिक ताण आणि व्यसन वाढतच जाईल.'' तर काही नेटकऱ्यांनी विरोध करत मत मांडले. त्यावर म्हणाले की, '' पूर्ण बंदीच उपाय नसतो, पालकांचं मार्गदर्शन आणि नियम महत्त्वाचे आहे.'' ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय जगासाठी एक लाईव्ह टेस्ट ठरत आहे. डेन्मार्क, न्यूजीलंड आणि मलेशिया यांसारखी अनेक देश या मॉडेलकडे उत्सुकतेने पाहत असून, खरोखरच हा निर्णय मुलांना सुरक्षित ठेवताना अभिव्यक्तीस्वातंत्र्याची सांगड कशी घालतो हे आता जग पाहणार आहे. भारत सोशल मीडिया वापरात जगात अग्रेसर असताना मुलांसाठी बंदीची मागणी पुढे वाढेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याला '' कुटुंबांसाठी अभिमानाचा दिवस'' अशी घोषणा करत म्हटलं की, सरकारांकडे मुलांना ऑनलाइन धोके, चुकीची माहिती, बुलिंग आणि मानसिक तणावापासून वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची ताकद असते. या नव्या कायद्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांनी मुलांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश देऊ नये, अन्यथा त्यांना तब्बल 49.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा म्हणजेच सुमारे 33 मिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंतचा दंड बसू शकतो.

social media ban
kadipatta chutney: कढीपत्त्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी; चव आणि आरोग्य दोन्हींसाठी फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com