Sakshi Sunil Jadhav
आपल्याला या जन्मात मिळालेले सुख दुःख आपल्या मागच्या जन्मातील चांगल्या वाईट गोष्टींमुळे असते हे आज जाणवेल. विशेष ओढा उपासनेकडे त्यामुळेच वाढेल. मनस्वास्थ्य चांगले राहील. दिवस चांगला आहे. धनयोग उत्तम आहेत.
कलाकारांना दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. व्यवसायामध्ये नवा काहीतरी बदल होईल. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे यामध्ये सकारात्मकता सुद्धा येईल. दिवस सौख्यकारक आहे.
वैवाहिक जीवनातून भाग्य फुलेल. जोडीदाराकडून छानसा काहीतरी फायदा होण्याची दाट शक्यता आहे. भावंड सौख्य चांगले राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. न ठरवता काही गोष्टी होतील. अडचणीच्या काळात आपलेच मदत करतात हे समजेल. कुटुंबामध्ये स्नेहबंध जोपासले जातील.
मोडेन पण वाकणार नाही अशी आपली रास आहे. आज स्वतःचे अस्तित्व सकारात्मक जाणवेल. नवनवीन संकल्पना योजना यांनी भारलेला दिवस असेल. आरोग्य उत्तम राहील. शिस्तबद्ध पद्धतीने दिवसाचा शेवट होईल.
परदेशातून फायदा दिसतो आहे. कदाचित मित्र-मैत्रिणी सुद्धा असू शकतील. काही गोष्टींमध्ये खर्च केल्याशिवाय चार चांगल्या गोष्टी मिळत नाहीत. आज मोठे खर्च होतील.
कामाच्या ठिकाणाहून केलेल्या गोष्टीचा योग्य परतावा धनाचे स्वरूपात मिळेल. व्यवसायामध्ये नवनवीन कल्पनांनी भरलेला आजचा दिवस आहे. मित्र-मैत्रिणींचे सुख चांगले असेल.
"लाथ मारेल तिथे पाणी काढेल" अशी आपली रास आहे. कुठेही न घाबरता आज जरी नवीन क्षेत्र असेल तरी प्रवेश कराल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल दिवस चांगला आहे.
दत्तगुरूंची कृपा राहील. मनामध्ये सकारात्मक भाव असतील. मोठ्या प्रवासांना दिवस चांगला आहे. आपले दानधर्म वाढेल. उदारता मुळे इतर लोकांना तुम्ही आपलेसेही कराल.
भ्रष्टाचार लाचलुचपत, नको तो पैसा, हुंडा, जोडीदाराकडून मिळणारा पैसा काळा पैसा यामध्ये गुंतलेला आजचा दिवस आहे. सावध आणि सजग राहून कामे करावीत. अन्यथा "आ बैल मुझे मार" अशी अवस्था होईल.
चोख कामे आज होतील. एकूणच यश घेऊन आलेला आजचा दिवस आहे. भागीदारी व्यवसाय सुरू करणार असाल तर हरकत नाही. सहकाऱ्यांच्याकडून उत्तम साथ मिळाल्यामुळे व्यापाराचा आलेख उंचावेल.
आजोळी प्रेम वाढेल. जवळच्या लोकांकडून घात झाल्यासारख्या मात्र गोष्टी होतील. सजग पणे कार्य करायला लागेल. नोकर चाकारांपासून महत्त्वाच्या गोष्टी सांभाळा.