kadipatta chutney: कढीपत्त्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी; चव आणि आरोग्य दोन्हींसाठी फायदेशीर

Sakshi Sunil Jadhav

कढीपत्ता चटणी रेसिपी

कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकातील एक महत्वाचा घटक आहे. अनेकदा तो फोडणीत वापरला जातो, पण कढीपत्त्याची चटणी देखील अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट असते. घरच्या घरी काही मिनिटांत ही चटणी तयार करता येते. वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी.

kadipatta chutney

कढीपत्ता स्वच्छ धुवा

सर्वप्रथम कढीपत्याची ताजी पाने निवडून स्वच्छ पाण्यात धुवा. धूळ किंवा माती असल्यास नीट साफ करा.

kadipatta chutney

हलकं भाजून घ्या

एका कढईत थोडं तेल गरम करून कढीपत्ता हलका परता. यामुळे चव आणि सुगंध उत्तम येतो.

kadipatta chutney

कोरडे साहित्य तयार ठेवा

कोरड्या खोबऱ्याचा चुरा, भाजलेली उडीद डाळ, आणि लाल मिरची किंवा हिरवी मिरची तयार ठेवा.

gray hair | getty images

लसूण आणि आलं घाला

चटणीला तिखट आणि सुगंधी चव देण्यासाठी थोडे लसूण आणि आलं वापरा.

kadipatta chutney

मीठ, चिंच मिसळा

चिंच किंवा लिंबाचा रस वापरून आंबटपणा वाढवता येतो. चवीनुसार मीठ घाला.

kadipatta chutney

सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटा

कढीपत्ता, खोबरं, डाळ, मिरची, मीठ, चिंच सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये वाटा. थोडे पाणी घालून पेस्ट बनवा.

curry leaf chutney recipe

फोडणी द्या

एकदा चटणी तयार झाली की मोहरी, जिरे आणि कढीपत्ता वापरून फोडणी देऊ शकता. हवाबंद डब्यात साठवा. ही चटणी ३ ते ४ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते. हवाबंद डब्यात साठवा. इडली, डोसा, भात, भाकरी किंवा पराठ्यासोबत ही चटणी अप्रतिम लागते.

curry leaf chutney recipe

NEXT: आयब्रो वाढतील फक्त ७ दिवसात, महागडे प्रोडक्ट सोडा अन् हा घरगुती उपाय वापरा

eyebrow growth tips | Google
येथे क्लिक करा