Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल लाइफमध्ये आयब्रोचे केस पातळ होणे ही सामान्य समस्या झाली आहे. पोषणाची कमतरता, रासायनिक प्रोडक्ट्स, वारंवार थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग यामुळे आयब्रोची वाढ आणि जाडी कमी होते.
नारळाच्या तेलात असलेले व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स आयब्रोच्या केसांना मुळांपासून पोषण देतात. झोपण्यापूर्वी हलक्या हाताने आयब्रोवर मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं.
ऐरंडेलचे तेलातील ओमेगा-9 फॅटी अॅसिड्स केसांच्या मुळांना मजबूत करतात. आयब्रो पातळ असतील किंवा काही जागा रिकाम्या असतील तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा अत्यंत कमी प्रमाणात लावा. रात्री लावून सकाळी धुवा.
कांद्यामध्ये सल्फर मुबलक असते जे नवीन छिद्र सक्रिय करण्यात मदत करते. कापसाने आयब्रोवर रस लावा आणि 20 मिनिटांनी स्वच्छ धुवा.
फ्रेश अॅलोव्हेरा जेल आयब्रो वाढीसोबतच त्वचेची आर्द्रता योग्य राखते. यातले एंजाइम्स आणि व्हिटॅमिन्स केसांना मजबूत करतात. दिवसातून एकदा लावा आणि तसेच ठेवा.
व्हिटॅमिन ई केस गळणे कमी करते आणि नवीन ग्रोथला चालना देते. कॅप्सूल फोडून त्यातील तेल आयब्रोवर लावून काही मिनिटे मालिश करा.
वारंवार आयब्रो शेप केल्याने केसांची मुळे कमजोर होतात. 4 ते 6 आठवडे थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करू नका. या काळात घरगुती उपाय वापरल्यास नैसर्गिक ग्रोथ वेगाने होते.
बदाम तेलात बायोटिन, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी काही थेंब लावून हलक्या हाताने मसाज करा.
मेथीत निकोटिनिक अॅसिड आणि लेसिथिन असते जे केस मजबूत करतात. भिजवलेली मेथी वाटून पेस्ट तयार करा आणि आयब्रोवर 20 मिनिटे लावा.