Dhanshri Shintre
सोशल मीडिया अकाउंट्स आता आपल्या डिजिटल ओळखीचा अविभाज्य भाग बनले असून, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर त्यांचे महत्त्व वाढले आहे.
सोशल मीडिया अकाउंट असुरक्षित असल्यास हॅकिंग, डेटा चोरी आणि वैयक्तिक प्रायव्हसीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतात, याची खबरदारी आवश्यक आहे.
सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे मजबूत, वेगळा आणि ओळखणे कठीण असा पासवर्ड तयार करणे होय.
यासोबतच, नेहमी द्वि-स्तरीय पडताळणी(Two Step Verification) सक्रिय ठेवा आणि तुमच्या खात्याच्या प्रायव्हसी सेटिंग्ज वेळोवेळी अद्ययावत करत राहा.
तुमचे लॉगिन आयडी कोणालाही देऊ नका आणि खात्याची सुरक्षा राखण्यासाठी ते नियमितपणे बदलण्याची सवय ठेवा.
सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा आणि तुमचे सर्व सोशल मीडिया अॅप्स तसेच ब्राउझर नेहमी अद्ययावत ठेवण्याची खबरदारी घ्या.
संशयास्पद लिंक्स आणि ईमेलवर क्लिक करण्याचे टाळा, तसेच अज्ञात किंवा अवांछित संपर्क त्वरित ब्लॉक किंवा अनफॉलो करा.