iPhone Cleaning: iPhone लवकर खराब होतोय? स्वच्छ करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Dhanshri Shintre

योग्य स्वच्छता

अ‍ॅपलने आयफोनची योग्य स्वच्छता राखण्यासाठी नवीन मार्गदर्शक नियम जारी केले आहेत, जे वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहेत.

नियमांचे पालन

अ‍ॅपलच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्यास आयफोनचे आयुष्य कमी होऊ शकते आणि तो लवकर खराब होऊ शकतो.

आयसोप्रोपाइल

तुमचा आयफोन स्वच्छ करण्यासाठी फक्त ७०% आयसोप्रोपाइल किंवा ७०% इथाइल अल्कोहोल वाइप्स वापरणे योग्य आहे.

क्लोरोक्स वाइप्स

तुम्ही आयफोन स्वच्छ करण्यासाठी क्लोरोक्ससारख्या निर्जंतुकीकरण करणाऱ्या वाइप्सचा देखील सुरक्षितपणे वापर करू शकता.

या गोष्टी टाळा

हायड्रोजन पेरोक्साइड किंवा ब्लीचसारख्या क्लीनिंग प्रॉडक्ट्सचा आयफोन स्वच्छ करण्यासाठी वापर टाळा, कारण ते उपकरणासाठी हानिकारक असू शकतात.

ओलावा

आयफोनच्या कोणत्याही पोर्ट किंवा उघडलेल्या भागात ओलावा जाण्यापासून सावध रहा, कारण त्यामुळे उपकरण खराब होण्याचा धोका आहे.

पाण्यात बुडवू नका

कधीही तुमचा आयफोन पाण्यात किंवा इतर कोणत्याही लिक्विडमध्ये बुडवू नका, कारण यामुळे तो कायमचा खराब होऊ शकतो.

मऊ कपड्याने पुसा

आयफोन स्वच्छ केल्यानंतर त्याला कोरडे आणि मऊ कपड्याने हलक्या हाताने पुसून ओलावा पूर्णपणे काढा.

NEXT: रात्री मळून ठेवलेले पीठ सकाळी वापरताय? थांबा! आरोग्यास हानिकारक ठरू शकते

येथे क्लिक करा