

राहुल गांधी यांनी २०० सरकारी अधिकारी संपर्कात असल्याचा दावा.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना खुली ऑफर
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राहुल गांधी आक्रमक
मुख्य निवडणुक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आता ज्ञानेश कुमारांना एक खुली ऑफर दिलीय.इतकचं काय तर सरकारी अधिकारी आणि पोलिसांबाबतही राहुल गांधींनी मोठा गौप्यस्फोट केलाय. काय आहे ही खुली ऑफर आणि कोणता गौप्यस्फोट केलाय? पाहूयात या या स्पेशल रिपोर्टमधून.
एकीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीनं कायदेशीर लढाईचा निर्णय घेतलाय. त्यांंच्या राजीनाम्यासाठी सर्व आघाड्यांवर मोर्चे उघडलेले असताना ज्ञानेश कुमारांबाबत राहुल गांधींनी आणखी एक नवा बॉम्ब टाकलाय. ज्ञानेश कुमार यांचे आपल्याला मेसेजेस येत असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केलाय... व्होट चोरीचे मुख्य गुन्हेगार दुसरेच असले तरी ज्ञानेश कुमार यांचा सहभाग असल्यामुळे त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावं आणि पदावरून जावं त्यांना आम्ही माफ करू अशी खुली ऑफर राहुल गांधींनी दिलीय.
दरम्यान विरोधकांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असला तरी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ५० टक्के पोलिसांचा आम्हाला पाठिंबा असून सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत.आणि तेच आम्हाला माहिती देत असल्याचा खळबळजनक दावाही राहुल गांधींनी केलाय. दुसरीकडे राहुल गांधींच्या या दाव्यानंतर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलयं...राहुल गांधीऐवढं खोटं बोलणारं कुणीच नसेल, अशी टीका केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी केलीय.
राहुल गांधींनी टाकलेल्या मेसेज बॉम्बमुळे आता ज्ञानेश कुमार यावर जाहीरपणे भूमिका मांडणार की मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा देऊन ज्ञानेश कुमार माफीचे साक्षीदार होणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.