वर्षभर शांतता ठेवा!अभिजीत दिपकेंसह सीजेपी नेत्यांसमोर न्यायालयाने घातलेल्या अटी आणि शर्ती काय?

CJP Abhijeet Dipke: न्यायालयाने अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका केलीय. मात्र, त्यांना शांतता राखण्याची स्पष्ट अट घालण्यात आलीय. त्यामुळे, शांततेचा भंग झाल्यास या अटीमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
Supreme Court conditions for CJP leader Abhijeet Dipke
Supreme Court conditions for CJP leader Abhijeet Dipkesaam tv
Published On: 
Summary
  • अभिजीत दीपके यांच्यासह सीजेपी नेत्यांची सुटका आणि न्यायालयाच्या अटी

  • कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांना वर्षभर शांतता राखण्याचे निर्देश

  • अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या सुटकेचे प्रकरण

'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) प्रमुख अभिजित दीपके आणि त्यांचे सह-संयोजक आशुतोष रांका व सौरव दास यांची कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सुटका केलीय. पंरतु सुप्रीम कोर्टानं त्यांच्यासमोर ठेवलेल्या अटींमुळे या तिघांपुढे मोठा पेच निर्माण झालाय. न्यायालयाने दिलेल्या आदेशात त्यांना वर्षभर शांतता राखण्याचं म्हटलंय.

कॉक्रोच जनता पक्षाकडून जंतरमंतर येथे आंदोलन पुकारलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र आंदोलन सुरू होण्याआधीच दिल्ली पोलिसांनी CJP चे संस्थापक दीपक, रंका आणि सौरव दास दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली.

Supreme Court conditions for CJP leader Abhijeet Dipke
Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

यासह देशभरात ७हजार आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना काही तास पोलिसांच्या ताब्यात ठेवल्यानंतर सोडण्यात आले. परंतु अभिजीत दीपके, सौरभ दास, आणि आशुतोष रांका यांना रविवारी त्यांना दिल्लीतील कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर प्रतिज्ञापत्र लिहून त्यांना सोडण्यात आले.

सुप्रीम कोर्टानं कोणत्या ठेवल्या अटी

अभिजीत दीपके,आशुतोष रांका आणि सौरव दास यांना सोडताना कोर्टाने त्यांना काही अटी घातल्या आहेत. अर्थात सुप्रीम कोर्टानं घातलेल्या अटींचं नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागू शकते. कोर्टाने घातलेल्या अटींमुळे पुढे भविष्यात दीपके, रांकासह दास यांना अडचणीत येऊ शकतात.

Supreme Court conditions for CJP leader Abhijeet Dipke
CJP च्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'फॉर्म ७' च्या नियमांत सुधारणा

कोर्टानं त्या तिघांकडूनही ५०,००० रुपयांचे हमीपत्र आणि एक वर्षासाठी लागू राहणारे शांतता राखण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. त्यांच्या सुटकेसाठी घालण्यात आलेल्या कठोर अटींनुसार, या तीन नेत्यांना पूर्णपणे शांतता राखावी लागेल. कायदा व सुव्यवस्था पाळावी लागेल. तसेच, सार्वजनिक सभा आयोजित करण्यापासून किंवा कोणताही अशांतता निर्माण करणारा प्रकार करण्यापासून दूर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिलेत.

सीजेपीच्या कायदेशीर कामकाज विभागाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी सांगितले की, अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची एका वर्षापर्यंत शांतता भंग न करण्याच्या अटीवर सुटका करण्यात आलीय. परिणामी, भविष्यात शांतता भंग झाल्यास या तिन्ही नेत्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, सीजेपीच्या नेत्यांनी सुटका झाल्यानंतर हा आमचा मोठा विजय झाल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com