Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात प्रशासकीय फेरबदल करण्यात आलाय. २०१० च्या तुकडीचे राजस्थान कॅडरमधील IAS अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उप निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय.
IAS Prakash Rajpurohit appointed Deputy Election Commissioner of India
IAS Prakash Rajpurohit appointed Deputy Election Commissioner of Indiasaam tv
Published On: 
Summary
  • भारतीय निवडणूक आयोगात महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल.

  • IAS अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उप निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती.

  • प्रकाश राजपुरोहित हे राजस्थान कॅडरचे सनदी अधिकारी आहेत.

देशात (SIR) विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकारण तापलंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरीचा आरोप केला जातोय. आरोपावरून विरोधकांसह सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्याचदरम्यान निवडणूक आयोगात मोठा फेरबदल करण्यात आलाय.

केंद्र सरकारने भारतीय निवडणूक आयोगात प्रशासकीय फेरबदल करत २०१० च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उप निवडणूक आयुक्त (DEC) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) या महत्त्वाच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवलाय. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, राजस्थान संवर्गाचे (कॅडर) सनदी अधिकारी असलेल्या प्रकाश राजपुरोहित यांच्याकडे एप्रिल २०३० पर्यंत उप निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

IAS Prakash Rajpurohit appointed Deputy Election Commissioner of India
Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

प्रकाश राजपुरोहित हे यापूर्वी मे २०२६ पासून संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात सहसचिव पदावर कार्यरत होते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नुकत्याच मंजूर केलेल्या २७ सहसचिव आणि समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या व्यापक फेरबदलाचाच हा एक भाग आहे. निवडणूक आयोगातील हे मोक्याचे पद गेल्या ऑगस्ट महिन्यापासून रिक्त होतं.

मतदार यादी आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागाचे तत्कालीन प्रभारी उप निवडणूक आयुक्त संजय कुमार यांची ऑगस्ट महिन्यात मुदतीपूर्वीच त्यांच्या मूळ संवर्गात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती दिल्ली सरकारमध्ये करण्यात आलीय. विशेष म्हणजे,२४ जून २०२५ रोजी देशभरात ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया सुरू करण्याबाबत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या महत्त्वाच्या आदेशावर संजय कुमार यांचीच स्वाक्षरी होती.

IAS Prakash Rajpurohit appointed Deputy Election Commissioner of India
CJP च्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'फॉर्म ७' च्या नियमांत सुधारणा

निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामकाजावरून आयोगामध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी अंतर्गत चर्चेदरम्यान या विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवले होते. यामध्ये जुलै महिन्यात संजय कुमार यांच्याकडून माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार काढून घेण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com