नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

Congress Fight In Party office : लखनौ येथील उत्तर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा आराधना मिश्रा आणि कार्याध्यक्ष इम्रान मसूद यांनी पदभार स्वीकारताना पक्षाच्या कार्यकर्ते भिडले.
Congress Fight In Party office
Up Congress Office Clash In Lucknow; Workers Hurl Shoes During Leadership Eventsaam tv
Published On: 
Summary
  • लखनौमधील उत्तर प्रदेश काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी.

  • नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आराधना मिश्रा आणि कार्याध्यक्ष इम्रान मसूद यांच्या पदग्रहणावेळी गोंधळ.

  • कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला आणि बूट फेकल्याची माहिती.

लखनौमधील उत्तर प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात प्रचंड हाणामारीचा प्रकार घडाला. कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला व बूट मारून फेकले. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा आराधना मिश्रा आणि कार्याध्यक्ष इम्रान मसूद हे पदभार स्वीकारत असतानाच कार्यकर्ते भिडल्याचं सांगण्यात येत आहे. कार्यकर्ते एकमेकांना चपला, बुटाने मारहाण करत होते.

Congress Fight In Party office
विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

कार्यकर्त्यांमधील ही हाणामारी दहा मिनिटांहून अधिक वेळ चालू होती. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलेल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं सांगितलं जातंय. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पदग्रहण समारंभादरम्यान अजय राय यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्या आराधना मिश्रा यांचे समर्थक नाराजी झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर काँग्रेस कार्यालयात हाणामारी सुरू झाली.

Congress Fight In Party office
राहुल गांधी ३०० खासदारांना सोबत घेऊन राजघाटाकडे रवाना; सरकारविरोधात विरोधकांचा एल्गार

काँग्रेसच्या एक महिला नेत्या आणि अजय राय यांच्याशी संबंधित एका घटनेमुळे हा वाद झाल्याचं सांगितलं जातंय. दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला आणि बूट फेकून मारली. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राज्याचे माजी अध्यक्ष अजय राय उपस्थित राहिले नाहीत.

जेव्हा याबद्दल प्रभारी अध्यक्ष इम्रान मसूद यांना विचारण्यात आले. त्यावेळी इम्रान मसूद म्हणाले की, माजी अध्यक्ष पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची परंपरा नाहीये. त्यांच्याकडून पक्षानं कार्यभार काढून घेतलाय. दरम्यान इम्रान मसूद यांनी यावेळी सांगितलं की, पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला असून त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा ते प्रयत्न करतील.

काँग्रेस उत्तर प्रदेशात बदल घडवून आणण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी काम करू असं ते म्हणाले. 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या एकजुटीवर भर देत, मसूद यांनी ठामपणे सांगितले की, ही आघाडी निवडणुकीत ताकदीनिशी उतरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com