Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप

Punjab Political News: पंजाबमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. आपच्या महिला आमदार अमनदीप कौर अरोरा यांच्या निवासस्थानी पहाटे ईडीने छापा टाकला.
Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप
Punjab Political NewsSaam Tv
Published On: 
  • पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

  • पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा

  • अमनदीप कौर अरोरा यांच्या निवासस्थानी पहाटे ईडीची छापेमारी

  • भाजपमध्ये प्रवेश न केल्याने ईडीची कारवाई केल्याचा आपचा आरोप

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ईडीने मोगा मतदारसंघाच्या आम आदमी पक्षाच्या आमदार डॉ. अमनदीप कौर अरोरा यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. डॉ. अमनदीप कौर अरोरा या पंजाब महिला आघाडीच्या अध्यक्षा देखील आहेत. या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या पहिल्या यादीत अमनदीप कौर यांना मोगा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास ईडीचे पथक मोगा येथील डॉ. अमनदीप कौर अरोरा यांच्या दोन्ही निवासस्थानी पोहोचले. गेल्या अनेक तासांपासून ईडीचे पथक त्यांच्या घराची तपासणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अरोरा घरीच असून ईडीचे पथक त्यांची चौकशी करत आहे. पण ज्या प्रकरणात ईडीने आज कारवाई केली आहे त्यासंबंधीची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप
Sanjay Raut: 500 कोटी कोणी दिले आणि कुठे गेले? संजय राऊतांनी अमित शाहांना लिहिलं पत्र, थेट ED ची मागणी

आमदार अमनदीप कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळेच ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला, असा आरोप करत आपच्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या घराबाहेर ईडीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या कारवाईनंतर भाजपवर आरोप केले जात आहेत. यापूर्वी, ईडीने माजी कॅबिनेट मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या निवासस्थानावर ४० तास छापा टाकला होता. माजी मंत्र्यांनी सांगितले की, या छाप्यात ईडीच्या पथकाला त्यांच्याविरोधात कोणताही दोषारोप करणारा पुरावा सापडला नाही आणि पथकाने त्यांच्या निवासस्थानातून कोणतेही नवीन दस्तऐवज किंवा रेकॉर्ड नेले नाही.

Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप
ED raid : राजकारणात खळबळ! पहाटे ५ वाजताच माजी मंत्र्यांच्या घरावर ED ची धाड, वकिलांचा गंभीर आरोप

ईडीच्या पथकाने फक्त त्या दस्तऐवज आणि रेकॉर्डमधील माहिती पाहिली, जी दक्षता विभागाच्या पूर्वीच्या कारवाईशी आणि आयकर विभागाने त्यांच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्याशी संबंधित होती. सुमारे ४० तास चाललेल्या या छापेमारीदरम्यान, निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था होती आणि कोणालाही आत जाण्याची परवानगी नव्हती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हेतूपूर्वक ही कारवाई करत असल्याचा आरोप आपकडून केला जात आहे.

Political News: महिला आमदाराच्या घरावर ईडीचा छापा, भाजपमध्ये प्रवेश न केल्याने कारवाई केल्याचा आरोप
ED raid : बड्या माजी मंत्र्याच्या घरावर ED ची छापेमारी; राजकारणात खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.