ED raid : राजकारणात खळबळ! पहाटे ५ वाजताच माजी मंत्र्यांच्या घरावर ED ची धाड, वकिलांचा गंभीर आरोप

ED raid Sunder Sham Arora : पंजाबचे माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते सुंदर शाम अरोरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने त्यांच्याशी संबंधित १६ ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई कथित ५ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा अंदाज आहे.
ED Raids Former Punjab Minister Sunder Sham Arora
ED Raids Former Punjab Minister Sunder Sham Arorasaam tv marathi
Published On: 

Why did ED raid Sunder Sham Arora : विधानसंभा निवडणुकीच्या आधी पंजाबच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. पंजाबचे माजी उद्योग मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या अडचणीत वाढ झाली. ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ईडीची टीम होशियारपूर येथील त्यांच्या निवासस्थानी धडकली. पथकाने घरावर छापा टाकून कसून चौकशी केली आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कशासाठी सुरू आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंजाबच्या काँग्रेस सरकारमध्ये उद्योगमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते सुंदर शाम अरोरा यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. सुंदर शाम अरोरा यांचे वकील एच.एस. सैनी यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, पहाटे ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुंदर शाम अरोरा यांच्या घरावर धाड टाकली. हे पथक चंदीगड कार्यालयाशी संलग्न आहे. ईडीची ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात केली जात आहे, हे अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, पथकाने काही विशिष्ट कागदपत्रांची मागणी केली आहे.

ED Raids Former Punjab Minister Sunder Sham Arora
पार्थ पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा स्फोट? सुनेत्रा पवारांसमोरच आमदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

आयकर विभागाने यापूर्वी तीन दिवस अरोरा यांच्या निवासस्थानी शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी अरोरा यांनी दावा केला होता की आयकर विभागाची ही कारवाई त्यांच्या मुलाच्या मालमत्ता व्यवसायाशी संबंधित होती. त्यांनी असेही सांगितले होते की, तपासादरम्यान अधिकाऱ्यांना कोणतेही बेकायदेशीर साहित्य आढळले नव्हते. पण आता ईडीच्या कारवाईमुळे पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ईडीकडून या कारवाईबाबत कोणतेही औपचारिक निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

ED Raids Former Punjab Minister Sunder Sham Arora
Maharashtra Weather : मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकलं; महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

ईडीने सोमवारी काँग्रेस नेते सुंदर शाम अरोरा यांच्याशी संबंधित १६ ठिकाणी छापे टाकले. मोहाली, चंदीगड, होशियारपूर, जालंधर आणि लुधियानासह अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. ईडीच्या पथकाने सुंदर शाम अरोरा यांच्या निवासस्थानीही छापा टाकला. या प्रकरणात माजी मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. ईडीची ही कारवाई सुंदर शाम अरोरा यांच्यावरील ५ कोटी रुपयांच्या लाचेच्या आरोपांशी संबंधित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.