पार्थ पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा स्फोट? सुनेत्रा पवारांसमोरच आमदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Parth Pawar, Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या कार्यप्रणालीवर काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका मांडण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोमवारी रात्री झालेल्या महत्त्वाच्या बैठकीतील घटनाक्रम समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाच्या अनेक आमदारांनी पार्थ पवार यांच्या कार्यप्रणालीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. पार्थ पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विचारूनच निर्णय घ्यायला हवेत, असा सूर आमदारांनी आवळला. ही सर्व नाराजी आमदारांनी थेट सुनेत्रा पवार यांच्यासमोर बोलून दाखवल्याने पक्षांतर्गत समीकरणांवर चर्चा रंगू लागली आहे. या बैठकीत पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही वरिष्ठ नेत्यांसोबत योग्य समतोल राखून काम करतील, अशा स्वरूपाची चर्चाही झाली.

या बैठकीत पक्षाच्या इतर धोरणांवरही आमदारांनी आपली मते मांडली. महायुतीतील घटक पक्षांतील नेत्यांकडून स्थानिक पातळीवर अपेक्षित मदत मिळत नसल्याची तक्रार करत, त्याचा फटका पक्षाला बसू नये अशी काळजी आमदारांनी व्यक्त केली. तसेच राज्याचे अर्थखाते लवकरात लवकर पुन्हा राष्ट्रवादीकडे यावे आणि पक्षाची बाजू अधिक सक्षमपणे मांडली जावी, अशी मागणीही करण्यात आली. आगामी काळात पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी सर्व आमदार दुष्काळ दौरा करतील आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याचा अहवाल सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.