ED raid : बड्या माजी मंत्र्याच्या घरावर ED ची छापेमारी; राजकारणात खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Gopal Kanda ED raid : माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या गुडगावमधील घर, फार्महाऊस आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी झाली. मनी लाँड्रिंग आणि वाटिका लिमिटेड प्रकरणातील कारवाईमागील कारण जाणून घ्या.
Gopal Kanda ED raid
Gopal Kanda ED raidSaam tv
Published On

Gopal Kanda money laundering case : 'हरियाणा लोकहित पार्टी'चे नेते आणि माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ED ने गुरुवारी भल्या पहाटे मनी लाँड्रिंगप्रकरणी गोपाळ कांडा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी धडक कारवाई करत छापे टाकले आहेत. ईडीच्या पथकांनी गुडगावमधील त्यांचे मुख्य निवासस्थान आणि वाटिका परिसरातील फार्महाऊसची एकाच वेळी झाडाझडती केली.

या अचानक झालेल्या कारवाईमुळे हरियाणाच्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली. कारवाईदरम्यान महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज, डिजिटल पुरावे आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या धाडीत नक्की काय हाती आले आणि चौकशीचा रोख कोणत्या दिशेने आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gopal Kanda ED raid
ATM मधून पैसे काढताना कधी किती चार्ज लागतो; जाणून घ्या SBI, HDFC, ICICI, PNB चे नियम

'वाटिका लिमिटेड' या रिअल इस्टेट कंपनीशी संबंधित कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने गोपाळ कांडा यांच्या घरावर छापा टकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली. छापेमारी ही वाटिका लिमिटेडविरुद्धच्या एका प्रकरणाशी संबंधित होती, ज्या कंपनीने गुंतवणूकदारांना वेळेवर ताबा, निश्चित परतावा, भाड्यापोटी मिळणारी रक्कम आणि विक्री करारांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊन व्यावसायिक प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

Gopal Kanda ED raid
BAMS Doctor Death: तरुण बीएएमएस डॉक्टराचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, वैद्यकीय वर्तुळात खळबळ

ईडीचा तपास सुरू असलेल्या चार प्रकल्पांमध्ये ६६१ गुंतवणूकदारांकडून २४८.४६ कोटी रुपयांची वसुली झाली होती. मात्र, ताबा देण्यात आला नाही. त्याशिवाय ठरलेली विक्रीपत्रेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणातील पैशांच्या व्यवहारांच्या तपासाचा भाग म्हणून एजन्सीने गुडगावमधील कांडा यांच्या कार्यालयावरही छापा टाकला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिअल इस्टेट कंपनीमधून वळवलेला निधी माजी मंत्र्यांशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा संशय आहे. कांडा यांचे घर, फार्महाऊस आणि कार्यालय येथे ईडीने टाकलेला छापा हा निधीच्या संशयास्पद हालचालींचा माग काढण्याचा भाग होता, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com