BAMS Doctor Death: तरुण बीएमएस डॉक्टराचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, वैद्यकीय वर्तुळात खळबळ

BAMS Doctor Death: अमरावतीत २२ वर्षीय बीएमएस डॉक्टराचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. औषधांच्या ओव्हरडोसचा संशय असून व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
BAMS Doctor Death
BAMS Doctor Death
Published On

अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी

अमरावती शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या २२ वर्षांच्या आदित्य रावते या तरुण बीएमएस (BAMS) डॉक्टराचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोरे होण्यासाठी स्वतःहून औषधे घेणे त्याला महागात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. औषधांच्या ओव्हरडोसमुळेच आदित्यचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे अमरावतीसह वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यने नाशिक येथून बीएमएस (BAMS) पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर तो अमरावतीतील एका नामांकित रुग्णालयात शिकाऊ (इंटर्न) डॉक्टर म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी तो खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आदित्य मृतावस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

BAMS Doctor Death
Gold Rate Today : गौरी आगमनाला सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा सर्वात मोठी घसरण; २४, २२ अन् १८ कॅरेटचे नवीन दर जाहीर

मृत आदित्यला लहानपणापासूनच फिटचा (अपस्मार) आजार होता, तसेच स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी तो स्वतःवरच उपचार करत काही औषधे घेत असल्याची माहिती मिळत आहे...यातूनच औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. आदित्य त्याच्या खोलीत उलटा झोपलेल्या अवस्थेत आढळला असून त्याच्या डोळ्यांतून रक्त येत होते, असे समोर आलेय.

BAMS Doctor Death
Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासानुसार, आदित्य स्वतः गोरे होण्यासाठी काही औषधे घेत होता. या औषधांचा अतिरिक्त डोस (ओव्हरडोस) झाल्यामुळेच त्याचा जीव गेला असावा, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे.

BAMS Doctor Death
राजकीय वर्तुळात भूकंप! कल्याणमध्ये भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवलं अन् ....

दरम्यान, पोस्टमार्टम अहवालात श्वासावरोध, हृदयविकाराचा झटका किंवा इतर कारणांची तपासणी केली जात आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पालकांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com