
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. असामध्ये पाकिस्तानमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कराचीपर्यंत या स्फोटामुळे दहशत पसरली आहे.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये एकामागून एक असे तीन स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी लाहोर एअरपोर्टजवळ हे स्फोट झाले. या स्फोटामुळे बऱ्याच किलोमीटरपर्यंत हादरले बसले. त्यानंतर सायरनची आवाज आली. स्फोटानंतर सर्व नागरिक इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले होते, अशी माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या मीडियाने हा ड्रोल हल्ला असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे. हा स्फोट कुणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लाहोरच्या गोपाळनगर आणि नसीराबाद परिसरात वाल्टन एअरपोर्टजवळ हे स्फोट झाले. नागरिक घाबरून घराबाहेर पळाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉल्टन एअरपोर्टनंतर ड्रोन हल्ला झाला आहे. स्फोटांनंतर लाहोर एअरपोर्ट तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हा एक प्रकारचा ड्रोन हल्ला असल्याचे बोलले जात आहे. वॉल्टन एअरपोर्टजवळ पाकिस्तानी लष्कराचे युनिट असलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला. या स्फोटानंतर वॉल्टन एअरपोर्टसोबत कराची एअरपोर्टवरील विमान वाहतूकही थांबवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.