
हा धमाका आहे भारताच्या काळजावर ओढलेल्या ओरखडयाच्या बदल्याचा.... हा धमाका आहे दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्याचा...होय... भारतानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उध्वस्त करुन पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय....भारताच्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालयच नाही तर लष्कर ए तोयबाच्या 5 टॉप कमांडरच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्यात...
- लष्करचा ऑपरेशनल कमांडर हाफिज अब्दुल मलिकचा खात्मा
- हाफिज अब्दुल मलिक मुरदकेच्या मरकज तोयबामध्ये उपस्थित
- लष्करच्या परदेशातील दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड मुदस्सीरही ठार
- वकास, हसनसह आणखी एका टॉप कमांडरचा मृत्यू
पहलगामच्या हल्ल्यात नीच दहशतवाद्यांनी 26 महिलांचं सिंदूर पुसलं...त्याचा बदला घेतलाय तो ऑपरेशन सिंदूरने.... भारतानं थेट पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उध्वस्त करत थेट कारवाई केलीय. त्यामुळे भारताच्या वाटेला गेल्यास भारत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची त्यांच्या घरात घुसून त्यांची वाट लावतो... हे भविष्यात पाकने लक्षात ठेवायला हवं....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.