
पाहिलत हे ट्विट.... 'पिक्चर अभी बाकी है' हे ट्विट करणारी व्यक्त साधीसुधी नाही. भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी एक धमाका भारत करणार याची चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या नुसत्या युद्ध सरावानं पाकची तंतरली होती. आता मनोज नरवणेंच्या या ट्विटने पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे यापुढेही दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. काही तज्ज्ञांनुसार ऑपरेशन सिंदूर ही दहशतवाद संपविण्याची सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे. नरवणे यांच्या ट्विटमुळे कुछ तो बडा होने वाला है...अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्याची काही कारणेही पुढे येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपमधील तीन देशांचा दौरा रद्द केला आहे.
नॉर्वे, क्रोएशिया, नेदरलँण्ड या देशांचा दौरा रद्द केला आहे.
लष्करी जवानांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यामध्ये बीएसएफ, सीआरपीएफ, आईटीबीपीसह सर्व अर्ध सैनिक दलांमधील जवानांची रजा रद्द करण्यात आली आहे.
सर्व जवानांना सतर्क राहून ड्युटीवर हजर राहण्याचे गृहमंत्रालयाचे निर्देश आहेत.
जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानच्या सीमेवर अतिरीक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
देशभरातील अनेक संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे
एअर इंडियाने नऊ शहरांमधील उड्डाणे रद्द केली आहेत
जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड, राजकोटमधील उड्डाणे रद्द
इंडीगो एअरलाईन्सने 160 देशांतर्गंत उड्डाणे रद्द केली आहेत
दिल्ली विमानतळावरही वेगवेगळ्या कंपन्यांची 20 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय कारवाई करणार याकडे देशासह संपूर्ण जगाचं लक्ष होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे. त्यामुळे भारत सिमापार जाऊन कारवाई करणार हे निश्चित होतं. अपेक्षेप्रमाणे 7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देण्यात आलं.
पीओके म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढविण्यात आला. मनोज नरवणे यांचं ट्विट आणि संरक्षण दलाची खबरदारी पाहता भारत आणखी मोठी कारवाई करु शकतं अशी चिन्ह आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांचं पालन पोषण करतंय. दहशतवाद्यांचा आका पाक लष्करच असल्याचं वास्तव आहे. त्यामुळे या आकाला कायमचा धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदुरनंतरचा पार्ट 2 काय असणार आहे? याकडे देशाचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.