Saam Tv
सध्या भारतात फक्त "ऑपरेशन सिंदूर"च्या चर्चा होत आहेत.
भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.
भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये १०० किमी आतमध्ये घुसून ९ दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले.
आता भारताने केलेल्या कारवाईला सिंदूर हे नाव का दिले आणि त्याचा कोणत्या घटनेशी संबंध आहे हे जाणून घेऊ.
नुकताच पहलगाममध्ये पाकच्या दहशदवाद्यांनी हल्ला केला.
तसेच तिथे असलेल्या परुषांना मारले. तसेच महिलांचे कुंकू म्हणजेच सिंदूर त्यांच्या डोळ्या देखत पुसले.
पहलगामच्या या हल्ल्याने संपुर्ण भारत देश हादरला.
या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने या ऑपरेशनला "ऑपरेशन सिंदूर" हे नाव दिले.
या हल्ल्याने हिंदुस्थानच्या संस्कृतीवर आणि कुटुंबावर भ्याड हल्ला झाला होता,
या मोहिमेला "ऑपरेशन सिंदूर" नाव दिल्याने, या कारवाईचा उद्देश स्पष्ट झाला, की भारतीय सैन्य केवळ दहशतवादाचा प्रतिकार करत नाही, तर ते भारतीय संस्कृती आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठीही सज्ज आहे.