पाकिस्तान सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार; 30 हून अधिक ठार, 100 पेक्षा जास्त जण जखमी

Pakistan Army Opens Fire on Protesters : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (पीओके) आंदोलकांवर पाकिस्तान सैन्याने गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 100 पेक्षा अधिक आंदोलनकर्ते जखमी झालेत.
Pakistan Army Opens Fire on Protesters :
Pakistan-occupied Kashmir witnesses major unrest as Pakistan Army allegedly opens fire on protesterssaam tv
Published On
Summary
  • पीओकेमध्ये आंदोलकांवर पाकिस्तान सैन्याने गोळीबार केल्याचा गंभीर आरोप.

  • घटनेत 30 हून अधिक जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी.

  • जेएएसी संघटनेच्या ‘लाँग मार्च’ आंदोलनादरम्यान हिंसाचार

पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर म्हणजेच पीओके पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी नरसंहार चालवला आहे. सैन्यानं आंदोलकांवर गोळीबार केला असून यात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर पीओकेमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

पीओकेमधील प्रमुख नागरी हक्क संघटनेने आरोप केला की, एका अंत्यसंस्कारावेळी नागरिक जमा झाले असताना पाकिस्तान सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर भारत सरकारनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी (जेएएसी)ने 9 जून रोजी ‘लाँग मार्च’चे आवाहन केले होते. या संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रशासन, अनुदान धोरणे आणि मूलभूत नागरी हक्कांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडलंय.

Pakistan Army Opens Fire on Protesters :
सरकारवरील संकट टळलं! 'त्या' 21 बंडखोर आमदारांना दिलासा; अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती

जेएएसीच्या नेतृत्वाखाली पीओकेमधील नागरिक अनेक महिन्यांपासून पाकिस्तान सरकार आणि सैन्याविरोधात आंदोलन करत आहेत. पाकिस्तान सरकार या भागातील नैसर्गिक संसाधनांचा वापर करते, मात्र स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा, विकास आणि समान हक्कांपासून वंचित ठेवते, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.

कुठे झाली गोळीबारीची घटना

जेएएसी ही संघटना पीओकेमध्ये स्वस्त दरातील गहू, वीज आणि इतर मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी लढा देत आहे. या सुविधा पुरविण्याचे आश्वासन पाकिस्तान सरकारने अनेकदा दिले असले तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे. जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. याचदरम्यान रावळकोटमध्ये पोलिसांच्या गोळीबारात शाहजैब हबीब नावाचा एक आंदोलक ठार झाला.

Pakistan Army Opens Fire on Protesters :
रात्री ८ वाजताच दुकानांची शटर करा बंद! सरकारचा नागरिकांना आदेश, शेजारील देशात काय घडतंय?

यानंतर मोठ्या संख्येने लोक त्याच्या अंत्यविधीसाठी जमले होते. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शोक व्यक्त करण्यासाठी लोक रुग्णालयाबाहेर जमले होते. त्यावेळी सुरक्षा दलांनी शोक व्यक्त करणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झालेत. संघटनेनेच्या प्रमुख नेत्यांनी आरोप केला की, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने अवामी अॅक्शन कमेटीच्या सदस्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिलेत.

आंदोलनाशी संबंधित नेत्यांच्या मते, ५जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पीओकेमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. स्थानिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तान सरकार आणि लष्कराला आधीपासूनच याची माहिती होती. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने 5 जून ते 20 जून या कालावधीत पीओकेमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला देणारी प्रवास सूचना (ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी) जारी केली होती, असं संघटनेच्या नेते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com