

21 बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई रद्द करण्यात आली.
तामिळनाडू सरकारवरील तातडीचे राजकीय संकट टळले.
विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राजकीय घडामोडींना नवे वळण दिले.
विधानसभा निवडणुकींपासून तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. येथील राजकीय ड्रामा अजुनही कायम असून आता यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी ज्या पक्षाने निवेदन दिलं होतं, त्याच पक्षाकडून त्यांना क्षमा याचनेचं निवदेन पत्र विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आलंय. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट मिळाला आहे.
राज्यातील विरोधात असलेल्या AIADMKला मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांनी मंगळवारी १३ मे रोजी झालेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या बाजूने मतदान केलेल्या पक्षाच्या २१ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान हा निर्णय AIADMK पक्षाचे महासचिव एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जातोय. विश्वासदर्शक ठरावादरम्यान पक्षाच्या काही आमदारांनी अधिकृत पक्षाचे उल्लंघन केलं होतं, त्यामुळे एडप्पाडी के पलानीस्वामी यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान आपला निर्णय जाहीर करताना अध्यक्ष म्हणाले की, सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या २१ आमदारांच्या कृतीबाबत क्षमा मागणारी चार पत्रे त्यांना पलानीस्वामी यांच्याकडून मिळाली होती. "१३ मे रोजी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षाच्या व्हीपने दिलेल्या निर्देशांविरुद्ध मतदान करणाऱ्या २१ बंडखोर आमदारांच्या वर्तनाबाबत एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याकडून चार पत्रे मिळाली.
ते पत्रे स्वीकारण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध दहाव्या अनुसूचीअंतर्गत असलेली कारवाई मागे घेतली आहे," असे प्रभाकर म्हणाले. मात्र ज्या चार आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत, त्यांच्यावरील कारवाई अजूनही सुरू झाली असून त्यांच्या प्रकरणांवर नंतरच्या टप्प्यात निर्णय घेतला जाईल, असं विधानसभा अध्यक्ष म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.