रात्री ८ वाजताच दुकानांची शटर करा बंद! सरकारचा नागरिकांना आदेश, शेजारील देशात काय घडतंय?

Energy Shortage In Pakistan: अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा संकट अधिक तीव्र होत आहे. यामुळे व्यावसायिक आस्थापनांसाठी आणि बाजारपेठेसाठी वेळ निश्चित करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून, सर्व बाजारपेठा, दुकाने आणि शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजता सक्तीने बंद करावे लागतील.
Energy Shortage In Pakistan:
Energy Shortage In Pakistan:
Published On
Summary
  • सरकारने बाजारपेठांसाठी नवीन नियम लागू केले.

  • अमेरिका-इराण तणावामुळे ऊर्जा पुरवठा आणि खर्चावर परिणाम

  • वीज बचत आणि ऊर्जा व्यवस्थापनासाठी पाकिस्तान सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे ऊर्जा संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे तेथील सरकारनं नवीन नियम लागू केली आहेत. राजधानी इस्लामाबादमधील व्यावसायिक आस्थापनांसाठी बाजारपेठेला वेळ निश्चित करून दिली आहे. सोमवारपासून (१ जून, २०२६), सर्व बाजारपेठा, दुकाने आणि शॉपिंग मॉल्स रात्री ८ वाजता सक्तीने बंद करावे लागणार आहेत.

Energy Shortage In Pakistan:
पाकिस्तानच्या चौकांना हिंदू देव-देवतांची नावं; ऐतिहासिक निर्णयामागे पाकची मखलाशी?

जिल्हा प्रशासनाचे उपायुक्त, इरफान मेमन यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत सूचनेद्वारे याला दुजोरा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या नवीन मुदतीची संपूर्ण आठवडाभर कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

Energy Shortage In Pakistan:
पाकिस्तान भूगोलात राहायचं की इतिहासात? लष्करप्रमुखांचा शेजारील देशाला इशारा

बाजारपेठांच्या वेळा काय आहेत?

बाजार, दुकाने आणि शॉपिंग मॉल्स:

रात्री ८:०० वाजता बंद होतील.

रेस्टॉरंट्स, किराणा दुकाने, बेकरी, फास्ट फूड आउटलेट्स आणि इतर खाद्य व्यवसाय:

रात्री १०:०० वाजेपर्यंत सुरू राहू शकतात.

लग्नाचे हॉल, तंबूची घरे, पार्टीची ठिकाणे आणि इतर कार्यक्रमांची ठिकाणे: रात्री १०:०० वाजेपर्यंत सुरू राहू शकतात.

यासह औषध दुकाने, रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, पेट्रोल पंप, दुग्धशाळा, क्रीडा सुविधा, कॉल सेंटर्स, डेटा सेंटर्स आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सेवा देणाऱ्या आयटी व आयटीईएस कंपन्यांना या बंदीतून पूर्णपणे सूट देण्यात आली असून त्यांना वेळेचं बंधन नसणार आहे. नवीन नियम केवळ व्यावसायिक जागांनाच नव्हे, तर खाजगी घरांमध्ये किंवा खासगी जागांमध्ये आयोजित होणारे कार्यक्रम, विवाहसोहळे आणि इतर समारंभांनाही लागू होतात. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

व्यापारी वर्गाकडून निर्णयाचा निषेध

दुसरीकडे, व्यावसायिक व्यापारी वर्गाकडून या निर्णयाचा विरोध केला जातोय. त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी बाजारपेठा दुपारी उघडतात आणि रात्री ११-१२ वाजेपर्यंत सुरू असतात. लवकर बंद केल्याने त्यांच्या उत्पन्नावर, लहान दुकानदारांच्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होईल. दुकानं बंद करण्याच्या वेळ निश्चित करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना सरकारनं सांगितलं की, दिवसाच्या प्रकाशात अधिक व्यावसायिक व्यवहार केल्याने रात्री होणारा वीजेचा वापर कमी होईल, परिणामी राष्ट्रीय ऊर्जेची बचत होईल आणि विजेची बिले कमी येतील.

देशातील ऊर्जा संकटाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी या व्यवस्थेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व व्यापारी संघटना आणि दुकानदारांना केले आहे. तर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर निर्माण झालेली प्रादेशिक अस्थिरता आणि ऊर्जा संकट निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. हल्ल्याच्या घटनांमुळे पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. वीज निर्मितीवर मोठा दबाव वाढलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com