Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Nitish Kumar Resign From Legislative Council: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर हा घटनात्मक निर्णय घेतला गेला असून आता मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शक्यता चर्चेत आहे.
Bihar Chief Minister Nitish Kumar resigns as MLC after being elected to Rajya Sabha, fueling speculation of a role in the Modi cabinet.
Bihar Chief Minister Nitish Kumar resigns as MLC after being elected to Rajya Sabha, fueling speculation of a role in the Modi cabinet.Saam Tv
Published On

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधानपरिषदेचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यावर घटनात्मकरित्या त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानपरिषद सदस्य संजय गांधी यांच्यामार्फत विधान परिषद सदस्य सचिवालायाकडे पाठवला.

Bihar Chief Minister Nitish Kumar resigns as MLC after being elected to Rajya Sabha, fueling speculation of a role in the Modi cabinet.
लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

राजीनामा देण्याआधी मुख्यमंत्री निवासस्थानी बैठकींचे सत्र

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच लगबग सुरू होती. JDU चे ज्येष्ठ नेते लल्लन सिंग, संजय झा आणि विजय चौधरी सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होते. प्रदीर्घ चर्चेनंतर नितीश कुमार यांनी आपला राजीनामा दिला.

Bihar Chief Minister Nitish Kumar resigns as MLC after being elected to Rajya Sabha, fueling speculation of a role in the Modi cabinet.
Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात

विधान परिषदचे आमदार संजय गांधी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन स्वतः विधान परिषदेत गेले. त्यांनी नितीश कुमार यांचा राजीनामा अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सुपूर्द केला. अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारल्याने, बिहार विधान परिषदेतील नितीश कुमार यांचा २० वर्षांचा कार्यकाळ संपला. ते २००६ पासून या सभागृहाचे सदस्य होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com