Nitish Kumar : नितीश कुमार यांचा याच आठवड्यात राजीनामा, भाजपच्या मुख्यमंत्र्यासाठी ३० मार्च टर्निंग पाईंट का?

Nitish Kumar resignation : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या आठवड्यात आपला पहिला राजीनामा देण्याची शक्यता आहे. बिहार राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप ३० मार्च हा दिवस एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Nitish Kumar Rajya Sabha :
Nitish Kumar Rajya Sabha :Saam TV Marathi
Published On

Nitish Kumar resignation latest news 2026 : नितीश कुमार गेल्या आठवड्यात राज्यसभेवर खासदार झाले, त्यानंतर बिहारमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चा वाढल्या आहेत. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदावर कोण विराजमान होणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. बिहारमध्ये भाजप आपला मुख्यमंत्री नेमतील, असा अंदाज वर्तवला जातोय. ३० मार्च २०२६ हा दिवस बिहारमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

नितीश कुमार मुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा एकाचवेळी देणार नसल्याचे समोर आले आहे. नितीश कुमार दोन टप्प्यात राजीनामा देतील, असे स्थानिक सूत्रांनी सांगितले आहे. पण राज्यसभेवर गेलेले नितीश कुमार केंद्रीय राजकारणात सक्रीय झाले तर त्यांना दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागेल.

Nitish Kumar Rajya Sabha :
Kharat Case : कॅप्टन खरातचे ते ५६ व्हिडिओ कुणी बाहेर आणलं, समोर आले नाव

आधी आमदारकी, मग मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आधी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देतील. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. नियमांनुसार, नितीश यांना एका ठराविक वेळेत विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे राज्यसभा सदस्यत्व सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येईल. ही अंतिम मुदत ३० मार्च असल्याचे म्हटले जात आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नितीश कुमार विजयी झाले. नियमांनुसार, ३० मार्चपर्यंत नितीश कुमार यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला नाही, तर त्यांची खासदारकी जाऊ शकते. त्यामुळे या आठवड्यात नितीश कुमार आमदारकीचा राजीमाना देतील. नितीश कुमार यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरही ते मुख्यमंत्रीपदी राहू शकतात. सध्याचे राज्यसभा खासदार आणि उपसभापती हरिवंश यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एप्रिलमध्ये नितीश यांचा कार्यकाळ सुरू होईल. १० एप्रिलपर्यंत नितीश औपचारिकपणे राज्यसभा खासदार होतील. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीश कुमार मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देतील. त्यानंतर बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळेल.

Nitish Kumar Rajya Sabha :
Accident : देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बाप-मुलगा अन् सुनेसह ५ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री

नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, हे निश्चित झाल्यानंतप बिहारमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार आहेत. समृद्धी यात्रेदरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार विविध स्टेजवरच सम्राट चौधरी मुख्यमंत्री होतील, असे सूचक विधान केले होते.सम्राट चौधरी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, मंत्री दिलीप जयस्वाल आणि मंगल पांडे यांच्या नावांचीही भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. पुढील काही दिवसांत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

Nitish Kumar Rajya Sabha :
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर फरार, रुपाली ठोंबरेंच्या पोस्टनं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com