Accident : देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बाप-मुलगा अन् सुनेसह ५ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh accident : देवदर्शन करून परतताना उत्तर प्रदेशात भीषण अपघातात बाप, मुलगा आणि सुनेसह ५ जणांचा मृत्यू झाला. चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज असून ४ जण गंभीर जखमी आहेत. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर आढावा.
Uttar Pradesh accident
Uttar Pradesh accident
Published On

family killed in road accident after temple Uttar Pradesh : २ कारमधून सगळं कुटुंब राजस्थानमध्ये देवदर्शनाला गेले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शनही घेतले, त्यानंतर रात्री घराकडे माघारी येत असताना काळ आडवा आला. चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार थेट झाडाला जाऊन जोरात आदळली. या दुर्दैवी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मागे असणाऱ्या दुसऱ्या कारने तात्काळ मदत करत पोलिसांना बोलवले अन् जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. उत्तर प्रदेशमधील चित्राहाट येथे गुरूवारी रात्री अपघात झाला. राजस्थानमधून देवीचं दर्शन घेऊन परत येत असताना दुर्दैवी घटना घडली.

उत्तर प्रदेशातील आग्राजवळील चित्राहट परिसरात गुरुवारी रात्री उशिरा भरधाव वेगाने येणारी एक कार झाडाला धडकली. या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण राजस्थानमधील करौली येथून माता कैला देवीचे दर्शन घेऊन परत येत होते. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uttar Pradesh accident
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर फरार, रुपाली ठोंबरेंच्या पोस्टनं खळबळ

मृतांमध्ये माजी लष्करी जवान कामता प्रसाद, त्यांचा मुलगा आणि सून यांच्यासह ५ जणांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे इटावाचे, तर तिघे औरैयाचे रहिवासी आहेत. ७० वर्षीय कामता प्रसाद यांचे कुटुंबीय दोन गाड्यांमधून माता कैला देवीचे दर्शन घेऊन आग्रा येथे परत येत होते. आग्रा-इटावा रस्त्यावर एका गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती झाडाला धडकली. पाठोपाठ येणाऱ्या गाडीतील कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Uttar Pradesh accident
Petrol Price : पेट्रोलच्या किंमती वाढल्या, गॅस सिलिंडरनंतर पॉवर पेट्रोल महागलं, वाचा पुण्यातील ताजे दर

मृतांमध्ये कामता प्रसाद, त्यांचा मुलगा, सून सीमा, तीन वर्षांची नात आराध्या आणि बोलेरो चालक ऋषी यांचा समावेश आहे. रोशनी, अवनीश, आदित्य आणि ऋषभ हे या अपगातात गंभीर जखमी झाले. दरम्यान, बोलेरो चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर मोठा आवाज ऐकू आला. गाडीतील लोकांच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक गावकरी घटनास्थळी धावून आले. लोकांनी गाडीची काच फोडून बोलेरोमधील लोकांना बाहेर काढले.

Uttar Pradesh accident
दैवी शक्तीच्या नावाने खरातची काळी कृत्ये, नराधम 'कॅप्टन' महिलांना कसा ओढायचा जाळ्यात? वाचा अत्याचाराची मोडस ऑपरेंडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com