Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात

petrol diesel excise duty cut India: पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याने आणि दर वाढल्यामुळे चिंतेत आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात
petrol diesel excise duty cut India latest newsSaam Tv
Published On

Summary -

  • केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात मोठी कपात

  • पेट्रोल १३ वरून ३ रुपये, डिझेल १० वरून शून्य

  • इंधन दर कमी होण्याची शक्यता

  • सर्वसामान्यांना महागाईत दिलासा

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटरवरून ३ रुपये प्रति लिटर केले. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये प्रति लिटरवरून शून्य केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू नयेत यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता. कच्च्या तेलाची आयात व्यवस्थित होत नसल्यामुळे देशामध्ये पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला. ही समस्या दूर करण्यासाठी आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील.

Petrol-Diesel: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटीमध्ये मोठी कपात
Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com