Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय घडामोड घडली आहे. ममता बॅनर्जीच्या टीएमसीमध्ये उभी फूट पडली. ३१ बड्या नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
Mamata Banerjee newsSaam tv
Published On
  • पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका

  • बंगाल निवडणुकीनंतर टीएमसीमध्ये अंतर्गत वाद

  • ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा

  • ३१ बड्या नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला

  • पश्चिम बंगालमध्ये राजकीय खळबळ

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हलीशहर नगरपालिकेतील १६ पैकी ७ टीएमसी नगरसेवकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाचे स्थानिक नेतृत्व निराश झाल्याचे सांगितले जात आहे. या पराभवानंतर टीएमसीतील अंतर्गत वाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांचरापारा आणि हलीशहर नगरपालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कांचरापारा नगरपालिकेत जिथे तृणमूल काँग्रेसचे २४ नगरसेवक आहेत त्यापैकी १५ जणांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, हलीशहर नगरपालिकेत तृणमूल काँग्रेसच्या २३ पैकी १६ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा दिला. हे सर्वजण पक्ष बदलतील अशी चर्चा होऊ लागली आहे.

Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

बिजापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुदीप्त दास यांनी अलीकडेच पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. १७ मे रोजी कल्याणी येथे तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. २० मे रोजी दुपारी नगरसेवक राजू साहनी यांच्या नेतृत्वाखाली १६ नगरसेवकांनी उपाध्यक्षांच्या उपस्थितीत हलीशहर नगरपालिकेत तातडीची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी सामूहिक राजीनामा दिला.

Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक नेतृत्वावरील असंतोषामुळे हलीशहर नगरपालिकेतील नगरसेवकांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांनी आरोप केला आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर खासदार पार्थ भोमिक यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. हलीशहर नगरपालिकेमधून राजीनामा देणाऱ्यांमध्ये ५ महिला नगरसेवकांचा समावेश आहे. अध्यक्ष सुभंकर घोष या प्रक्रियेपासून दूर राहिले आहेत. विजयापूरच्या आमदार सुदीप्ता दास यांनी राजीनामा दिलेल्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले.

Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणुकीत पराभव होताच TMC पक्षात फूट? आमदारांमध्ये पडले दोन गट, राजकीय वर्तुळात खळबळ

बुधवारी तृणमूल काँग्रेसने निवडणुकीनंतर पहिले मोठे आंदोलन केले. या आंदोलनात अनेक आमदारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ८० आमदारांपैकी फक्त ३५ जण या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये संघटनेतील संभाव्य मतभेदांविषयी चर्चांना उधाण आले. विधानसभा निवडणुकीनंतर टीएमसी पक्ष पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करत असताना अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाची पसंती मानले जाणारे शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि इतर व्यावहारिक कारणांमुळे अनेक आमदार कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगून पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

Political News: भाजपचं सरकार येताच ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या ३१ बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: दादांच्या राष्ट्रवादीला गटातटांनी पोखरलं? बंड शमवण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com