

निवडणुकीतील पराभवानंतर टीएमसीमध्ये गटबाजीची चर्चा
अनेक आमदार आंदोलन कार्यक्रमात अनुपस्थित
ममता बॅनर्जी यांच्या पक्षात अंतर्गत संघर्ष वाढल्याचे संकेत
अजित पवार गटाचे २२ आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली असून राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा असताना आणखी एक पक्षात फूट पडली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील टीएमसीमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये निवडणूक लढवल्यानंतर ममता बनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी पक्षाच्या पहिल्या मोठ्या आंदोलनाच्या कार्यक्रमातून अनेक टीएमसी आमदारांच्या अनुपस्थितीमुळे नवीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे.निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आणि फेरीवाल्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या एका गटाने विधानसभा परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले.
पंधरा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधी बाकांवर बसावे लागल्याने पक्षाचे हे पहिलेच संघटित आंदोलन होतं. यावेळी शोभनदेव चट्टोपाध्याय, नयना बॅनर्जी, कुणाल घोष आणि ऋतब्रता बॅनर्जी हे उपस्थित होते. ८० आमदार असलेल्या टीएमसी पक्षातील ३५ आमदारांनी या आंदोलनाला उपस्थिती लावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात संघटनेत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्ष निवडणुकीतील पराभवानंतर स्वतःची पुनर्बांधणी करण्यासाठी धडपडत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान टीएमसीचे ज्येष्ठ आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी अंतर्गत कलहाचे वृत्त फेटाळून लावले आहे. आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण त्यांनी दळणवळणातील अडचणी आणि इतर संघटनात्मक जबाबदाऱ्या असल्यामुळे आमदारांना येण्यास वेळ झाल्याचं त्यांनी सांगितले. "आजच्या कार्यक्रमात सुमारे ३५ आमदार उपस्थित होते. निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराने प्रभावित झालेल्या अनेक भागांमध्ये आमदार कार्यकर्त्यांसोबत व्यस्त असल्याने अनेकजण उपस्थित राहू शकले नाहीत.
याशिवाय आंदोलनाचे आयोजन एका दिवसाच्या सूचनेवर आयोजित करण्यात आले होते, त्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या आमदारांना उपस्थित राहणे अवघड होतं. असे शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी सांगितले. दरम्यान कालीघाट येथे एका दिवसापूर्वी आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीत अनेक आमदारांनी टीएमसीचं पुर्नबांधणी करण्यासाठी पक्ष केवळ रणनीती सत्रांमधून स्वतःचे पुनरुज्जीवन करू शकत नाही. तर लोकांना तळागाळाच्या पातळीवर संघटित करून त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची गरज आहे.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, काही आमदारांनी निवडणुकीतील पराभवानंतर 'रस्त्यावर उतरून आंदोलन' करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने पुढाकार न घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली. वृत्तानुसार अनेक आमदारांनी हे स्पष्ट केले की, बंद दाराआड बैठका घेतल्याने नागरिकांचा पाठिंबा मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.