ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

mamata banerjee tmc party : ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. टीएमसीच्या खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळतेय.
mamata banerjee tmc news
mamata banerjee tmc party Saam tv
Published On
Summary

देशात आणखी एक पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा

ममता बॅनर्जी यांचा पक्षातील खासदार नाराज

खासदारांच्या नाराजीमुळे ममता बॅनर्जी यांचं टेन्शन वाढलं

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. टीएमसीच्या लोकसभा खासदारांचा एक गट पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज आहे. लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद पदावरून काकोली घोष दस्तीदार यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामळे पक्षात नवा वाद निर्माण झाला आहे. अनेक महिला खासदारांनी बंडाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

mamata banerjee tmc news
West Bengal Politics : ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यास नकार, निवडणूक आयोगानं उचललं मोठं पाऊल

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, टीएमसी खासदारांनी नियुक्तीवरून चिंता व्यक्त केली आहे. कल्याण बॅनर्जी यांच्यावर महिला खासदारांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. बंडाच्या भूमिकेत असलेल्या खासदारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. लोकसभेत टीएमसीचे २८ खासदार आहेत. त्यात ११ महिला आहेत.

मागील वर्षी महुआ मोइत्रा चर्चेत आल्या होत्या. त्यांना गेल्या वर्षी लोकसभेच्या मुख्य प्रतोदपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यांच्या नियुक्तीची घोषणा ही माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत घोषणा करण्यात आली होती.

mamata banerjee tmc news
आम्ही हरलेलो नाही; ममता बॅनर्जी यांना पराभव अमान्य, कुणाला ठरवलं व्हिलन ?

महुआ यांनी कल्याण बॅनर्जी यांच्यावर काय आरोप केले होते?

मागील वर्षी महुआ मोइत्रा यांचा विवाह माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत झाला. त्यावर कल्याण बॅनर्जी यांनी टिप्पणी केली होती. त्यावरून महुआ मोइत्रा यांनी तीव्र शब्दात कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. 'डुक्कराशी कुस्ती खेळू नये. कारण डुक्कराला त्यात मजा येते. परंतु तुम्ही त्यात घाण होता. भारतात अनेक पुरुष स्त्रीद्वेषी, लैंगिकदृष्ट्या निराश आहेत. संसदेत सर्व पक्षांमध्ये ते आहेत, अशा शब्दात महुआ यांनी नाव घेता टोला लगावला होता. या वादानंतर कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेत टीएमसीच्या मुख्य प्रतोद पदावरून राजीनामा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com