आम्ही हरलेलो नाही; ममता बॅनर्जी यांना पराभव अमान्य, कुणाला ठरवलं व्हिलन ?

Mamata Banerjee press conference : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
Mamata Banerjee news
Mamata Banerjee saam tv
Published On

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावला. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार आगपाखड केली. आम्ही विधानसभा निवडणूक हरलेलो नाही. तर आम्हाला हरवण्यात आलं आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने आमचा पराभव केला आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Mamata Banerjee news
माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; माजी खासदाराकडून नव्या पक्षाची घोषणा, राजकारणात खळबळ

ममता बॅनर्जी यांनी भाजपसहित निवडणूक आयोगावरही जोरदार हल्लाबोल केला. 'एसआयआर'च्या माध्यमातून ९० लाख मतदार हटवण्यात आले. भाजपने १०० जागांची चोरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून आम्हाला पराभूत केलं. आम्हाला पराभूत करण्यासाठी भाजपने विविध मार्गांचा अवलंब केला. इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. माझं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, 'आमची निवडणूक भाजपसहित निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. २००४ साली अशा प्रकारचे अत्याचार पाहिले नव्हते. निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग नाही. 'एसआयआर'च्या माध्यमातून ९० लाख हटवण्यात आले. निवडणूक आयोगाच्या साथीने भाजपने आमचा पराभव केलाय'.

ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. 'माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. आम्ही निवडणूक हरलो नाही. मी लोकभवनात जाऊन राजीनामा देणार नाही. पक्षातील सदस्यांसोबत पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. भाजपचे अत्याचार सहन करणार नाही. मी रस्त्यावर परत जाईल, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली.

Mamata Banerjee news
काँग्रेसला मोठा धक्का! ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

'इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. सोनिया गांधी यांनी मला फोन केला होता. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव यांनी मला फोन केले. इंडिया आघाडी माझ्यासोबत असून अखिलेश यादव हे उद्या पश्चिम बंगालमध्ये येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com