

माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या मुलीने स्थापन केला नवा पक्ष
'तेलंगणा राष्ट्र समिती' असे पक्षाचे नाव
नव्या पक्षाच्या एन्ट्रीने तेलंगणात खळबळ
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी , माजी खासदार के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. कविता यांनी 'तेलंगणा राष्ट्र समिती' असे पक्षाचे नाव ठेवले आहे. त्यांच्या वडिलांनी देखील या नावाने आंदोलनाना सुरुवात केली होती.
काही महिन्यांपूर्वी के. कविता यांना कारवाईचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी त्यांची 'भारत राष्ट्र समिती' पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी भूमिका आणि कारवाया केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर के कविता यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती.
के कविता यांनी म्हटलं की, 'तेलंगणा राज्याला स्थापन होऊन १२ हून अधिक वर्ष झाले आहेत. परंतु लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. १२ वर्षांनंतरही लोकांच्या पाणी, पैसे आणि रोजगाराच्या समस्या कायम आहेत'.
कविता यांनी आरोप केला की, ' मागील सरकारने शेतकरी, तरुण, उद्योजक, मागासवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. आता नव्या पक्षाचा उद्देश सर्वांचा विकास आणि आत्मनिर्भर करण्याचा आहे'.
'पक्षाचा सिद्धांत शासनाच्या मार्फत लोकांचे प्रश्न सोडवणे हा आहे. स्थानिकांचे प्रश्न नेहमी राजकीय पक्ष दुर्लक्ष करतात. जात, धर्माचा भेदभाव न करता लोकांची सेवा करू, असे के. कविता यांनी सांगितले.
के. कविता यांनी बीआरएस आणि भाजपवर जोरदार टीका केली. 'तेलंगणात बीआरएस आणि भाजप विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यास अयशस्वी ठरली आहे. बीआरएस पक्ष १००० वर्षांनंतरही बदलणार नाही. तेलंगणा राज्य निर्माण करण्यासाठी लढणाऱ्यांना लोकांचा उल्लेख देखील केला जात नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.