काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा देत पक्ष सोडला

congress : काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे .
Congress Internal Rift
Congress newsSaam tv
Published On
Summary

आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का

आसाममध्ये उमेदवाराने अचानक घेतली निवडणुकीतून माघार

ऐन निवडणुकीत उमेदवाराने माघार घेतल्याने चर्चांना उधाण

आसामसहित तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान काँग्रेसला आसाममध्ये मोठा धक्का बसला आहे. मतदान सुरू होण्याच्या काही तासाआधीच काँग्रेसचे उदलगुरी मतदारसंघातील उमेदवार सुरेन दायमारी यांनी माघार घेतली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देखील दिला आहे.

सुरेन दायमारी यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच निवडणुकीतून माघार घेत असल्याचेही स्पष्ट केले. दायमार यांनी निडवणुकीतून माघार घेतली असली तरी, त्यांचं नाव ईव्हीएममध्ये असणार आहेत. त्यांनी मतदानाच्या काही तास आधीच माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'त्यांनी माध्यमांशी येऊन काँग्रेस पक्ष सोडल्याचे सांगितले. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृतपणे राजीनामा पाठवलेला नाही'.

Congress Internal Rift
Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

सुरेन दायमारी यांनी म्हटलं ?

दायमारी यांनी म्हटलं की, 'काँग्रेसमध्ये राहून काही फायदा नाही. माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांसाठी काम करते. त्यांनी माझ्या आदिवासी समाजाला कोणताही अधिकार दिला नाही. त्यांच्यासाठी काही केलं नाही'.

Congress Internal Rift
निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

'काँग्रेसने मला उदलगुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. परंतु पक्षाने माझा प्रचार केला नाही. मी पक्षाकडे अनेकदा प्रचाराची मागणी केली. परंतु पक्षातील नेत्यांनी माझा फोन उचलला नाही. माझी कोणी मदत केली नाही, याचं दु:ख होत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील साथ दिली नाही, असे दायमारी यांनी सांगितले.

कोण आहेत सुरेन दायमारी?

सुरेन दायमारी हे ७३ वर्षीय नेते आहेत. ते निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, उदलगुरीमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी आहे. त्यानंतरही या मतदारसंघात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षाकडून समर्थन मिळालं नाही. मी तिकीट मागितलं नव्हतं, असाही दावा सेरन दायमारी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com