Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

Congress MP Join BJP: आसाममध्ये एका मोठ्या राजकीय घडामोडीत, खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी एका दिवसात काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाला मोठे बळ मिळाले आहे.
Congress
pradyut bordoloi joins bjp after quitting congress, big setback ahead of electionsSaam tv
Published On

ऐन निवडणुकीत आसामच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली आहे. खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी आपल्या काँग्रेस खासदारकीचा राजीनामा मंगळवारी दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Congress
Maharashtra Politics: दिल्लीहून परतताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, ठाकरेंचे 4 नगरसेवक फोडले; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या निमंत्रणावरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बोरदोलोई यांच्या भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत बोरदोलोई यांना उमेदवार म्हणून उभे करावे, अशी शिफारस राज्य पक्ष केंद्रीय नेतृत्वाकडे करेन. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Congress
मोठी बातमी! भाजप आमदाराला 'पीएमओ'चा दणका; थेट पीएम मोदींनीच दिले कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?

"आत्मसन्मान असलेला कोणीही तिथे राहू शकत नाही," असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. काँग्रेस नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत राहील, असेही मुख्यमंत्री शर्मा म्हणाले. "आत्मसन्मान असलेल्या कोणत्याही व्यक्तीने काँग्रेस पक्षात राहण्याचे काही कारण नाही. अधिकाधिक काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये आणू असंही ते म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी बुधवारी बोरदोलोई यांचा राजीनामा "अत्यंत दुर्दैवी" असल्याचे म्हटले. ते एका विशिष्ट जागेच्या तिकिटावरून नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या राजीनाम्यापूर्वी आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही, असेही त्या म्हणाल्या. राजीनामा देण्यापूर्वी त्यांना बोरदोलोई यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली असती तर बरे झाले असते, असेही त्या म्हणाल्या.

राजीनाम्यामागे पक्षांतर्गत कलह

आसाम विधानसभा निवडणुकीला अवघे २० दिवस उरले असताना, काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सदस्य प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी रात्री पक्षाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यात बोरदोलोई यांनी पक्षांतर्गत समस्या आणि दुर्लक्ष आणि अविश्वास दाखवल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ते या निर्णयामुळे आनंदी नाहीत, परंतु वारंवार होणारा अपमान आणि पक्षांतर्गत पाठिंब्याच्या अभावामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com