

अकोल्यातील चार नगरसेवकांनी पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश केला.
अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात
अकोला महानगरपालिकेत ही राजकीय घडामोड घडली.
दिल्ली दौऱ्यावरून परत येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डाव खेळत ठाकरे गटाचे चार नगरसेवकांना पक्षातून फोडलं. दिल्ली दौऱ्यावर असताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत सावध उत्तर दिलं होतं. पण दिल्लीहून मुंबईत परताच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिंदे यांच्या पक्षाने ठाकरे गटाचे अकोल्यातील चार नगरसेवक फोडले आहेत. यामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय. अकोला महानगरपालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने अकोल्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आता अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे फक्त दोन नगरसेवक उरले आहेत.
एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्लीला गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. या चर्चेत पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांविषयी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीहून मंगळवारी उशीरा रात्री राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या चार नगरसेवकांसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील सागर भारुका सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या नगरसेवकांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.