

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत प्रश्न केला. त्यावर एकनाथ शिंदेंनी हसतहसत उत्तर दिलं. (Eknath shinde on uddhav thackeray: deputy cm’s one-line reply sparks political buzz)
उद्धव ठाकरेंवर टीका करताना विधान परिषदेचे आमदार व्हायचे असेल तर एकनाथ शिंदेंना फोन करा. एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत, असं विधान खासदार नरेश म्हस्के यांनी केलं होतं. खासदार म्हस्केंच्या विधानावरून पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न केला की, जर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का? त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, आता राज्यसभेची निवडणूक झाली. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल. तेव्हा बघू, असं उत्तर शिंदे यांनी हसतहसत दिलं.
अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे दर अधिवेशनामध्ये मी आपल्या खासदारांना, मंत्री महोदयांना भेटायला येत असतो. काल खासदारांबरोबर बैठक झाली आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो. त्यांच्याशी महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. ही एक सदिच्छा भेट होती.
कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचंय ते मी करत असतो. मोदी साहेबांना भेटलो तरी विरोधक टीका करतात, पण मी माझं काम टिकेला कामाने उत्तर देण्याचं करतो. मला कोण काय बोलतंय, याचा मी विचार करत नाही."
आम्ही डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्या उच्चविद्याविभूषित आहेत आणि गरिबीतून आलेल्या आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न त्या राज्यसभेमध्ये पोटतिडकीने मांडतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील, असा विश्वास मला आहे."
पंतप्रधान मोदीजींनी २०१४ पासून जे विकासाचे काम केले आहे, त्याचा फायदा प्रत्येक राज्याला झाला आहे. विकास हाच मोदीजींचा अजेंडा आहे आणि त्यामुळे पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये एनडीएला आणि भाजपला मोठे यश मिळेल.
"बाळासाहेब ठाकरे हे पूर्णपणे राष्ट्रभक्त होते. 'नेशन फर्स्ट' (राष्ट्र प्रथम) हा त्यांचा विचार होता. आम्ही तोच विचार पुढे नेत आहोत. अशा वेळी विरोधकांनीही राजकारण बाजूला ठेवून देशासाठी एकत्र यायला हवे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.