

केडीएमसीच्या राजकारणात मोठी घडामोड.
नगरसेवक मधुर म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश
या घडामोडीमुळे ठाकरे गटाला राजकीय धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवलीचं राजकारणात चांगल्याच नाट्य घडामोडी होत आहेत. ठाकरे गटाने हाकालपट्टी केलेले नवनिर्वाचित मधुर म्हात्रे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मधुर म्हात्रे यांना हाती धनुष्यबाण घेतलंय. यावेळी आमदार राजेश मोरेही उपस्थित होते.
काही दिवसापूर्वीच मधुर म्हात्रे यांच्यावर ठाकरे गटाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची हाकलपट्टी केली होती. जरी म्हात्रे यांच्या हाकलपट्टी झाली करण्यात आली होती, तरीही हा ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जातोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. मात्र मतमोजणीनंतर मधुर म्हात्रेसह आणखी दोन नगरसेवक पक्षाच्या संपर्कात नव्हते.
शेवटी हे तिन्ही नगरसेवक शुक्रवारी कोकण भवन येथे हजर राहून सदस्य नोंदणी केली. मात्र या तिघांना पक्ष प्रक्रियेपासून दूर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती. तब्बल २८ दिवस संपर्काबाहेर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली होती.
शेवटी हे ३ नगरसेवक शुक्रवारी कोकण भवन येथे हजर राहून सदस्य नोंदणी केली. मात्र या तिघांना पक्ष प्रक्रियेपासून दूर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती. तब्बल २८ दिवस संपर्काबाहेर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.