मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Attack On NCP Leader: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमात असताना काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केली. एकाने पाठीमागून धारदार शस्त्राने हल्ला केला.
Published on
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते शिंदे यांच्यावर हल्ला.

  • घटना धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे घडली.

  • साखरपुड्याच्या कार्यक्रमात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला.

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी

अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला आहे. धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील माजी जिल्हा अध्यक्ष किरण एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला झाला आहे. किरण शिंदे हे साखरपुड्याच्या कार्यक्रमात गेले होते त्यावेळी त्यांना मारझोड झाली. त्यावेळी तर एकाने पाठीमागून त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: ...त्यानंतरच राहुरी पोटनिवडणूक लढवण्याबाबत निर्णय, प्राजक्त तनपुरेंच्या मनात नेमकं काय? फडणवीसांचंही केलं कौतुक

हाती आलेल्या माहितीनुसार, किरण एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी गोताणे येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी तेथे काही व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यादरम्यान एकाने पाठीमागून एकाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. दरम्यान सहकाऱ्यांनी तत्काळ तत्परता दाखविल्याने किरण शिंदे हे बचावले.

पूर्ववैमनस्यातून अजित पवार गटाचे नेते किरण शिंदे यांच्यावर हल्ला झाला अशी माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी त्यांनी धुळ्यातील तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
Baramati By-Election: बारामतीचा उमेदवार ठरला! राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव जाहीर, बिनविरोध होणार का?

जळगाव शहरात भाजपच्या माजी नगरसेवकाची हाणमारी

शहरातील शनी पेठ पोलीस ठाण्यात भाजपचा माजी नगरसेवकांचा गट आणि युवकांच्या गटात तुफान राडा झाल्याची घटना शनिवारी घडली होती. पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या रूमध्येच हाणामारी झाली होती. या दोन्ही गटातील वादाला महापालिकेच्या निवडणुकीची किनार असल्याचं सांगितलं जात आहे.

जळगाव येतील वाल्मिक नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा समोरच्या एका युवकांच्या गटाशी वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी माजी नगरसेवक शनी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. माजी नगरसेवकाबरोबर यावेळी पाच-सहा कार्यकर्ते होते. त्यावेळी या माजी नगरसेवकांनी युवकाना मारहाण सुरू केली. यानंतर युवकांच्या गटातील काही जण आक्रमक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com