Maharashtra Politics: ...त्यानंतरच राहुरी पोटनिवडणूक लढवण्याबाबत निर्णय, प्राजक्त तनपुरेंच्या मनात नेमकं काय? फडणवीसांचंही केलं कौतुक

Ahilyanagar Politics: राहुरी पोटनिवडणुकीपूर्वी प्राजक्ता तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून त्यांची उमेदवारी चर्चा होत असताना त्यांनी फडणवीसांचा उदो-उदो केलाय.
Ahilyanagar Politics:
Prajakta Tanpure's statement in the backdrop of the Rahuri by-election saam tv
Published On
Summary
  • राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीची चर्चा.

  • तनपुरे यांनी शरद पवार यांच्या यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या कामाचे कौतुक.

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

भारतीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणाही केली.बारामती निवडणुक बिनविरोध होणार असल्याची चर्चा तर राहुरी पोटनिवडणूक मात्र कांटे कीट टक्कर होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार तनपुरेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.पण प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या उमेदवारीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचेही कौतुक केले आहे.

Ahilyanagar Politics:
Baramati Election: बारामती बिनविरोध तर राहुरीबाबत सस्पेन्स कायम; पोटनिवडणुका जाहीर होताच विरोधकांनी आखली रणनीती

मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे काम कुणी डावलू शकत नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे, असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय आहे.

तनपुरे यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार गटाकडून उमेदवारीची देण्याची चर्चा असताना तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केलं, यामुळे तनपुरेंच्या मनात काय चालू आहे, असा सवाल उपस्थित होतोय. राहुरी पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू, असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना तनपुरे म्हणाले की, गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशी इच्छा आहे. आमच्यावर निवडणुका लादल्या तर आम्ही लढायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

Ahilyanagar Politics:
Baramati By-Election: बारामतीचा उमेदवार ठरला! राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव जाहीर, बिनविरोध होणार का?

दरम्यान भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. इतकेच नाहीतर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यावरून त्यांनी आपणच प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून देत आहेत. पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एकएक आमदार महत्वाचा असतो. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे.

माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com