Baramati Election: बारामती बिनविरोध तर राहुरीबाबत सस्पेन्स कायम; पोटनिवडणुका जाहीर होताच विरोधकांनी आखली रणनीती

Baramati- Rahuri By-Poll : महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका २३ एप्रिल रोजी होणार आहेत. तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. राजकीय पक्षांनी या स्पर्धेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
Baramati- Rahuri By-Poll
Dates for Baramati and Rahuri by-elections announced; Political parties' strategy beginsSaam Tv
Published On
Summary
  • दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • राष्ट्रवादी शरद पवार कुठलाही उमेदवार देणार नाही

  • राहुरीबाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.

पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगरमधील राहुरी या मतदारसंघाच्या पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच, विरोधकांनी महायुतील चीतपट करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

Baramati- Rahuri By-Poll
Assembly Election: ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी, ४०हजार मतमोजणी अधिकारी...; कशा पार पडतील ५ राज्यांमधील निवडणुका?

दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची इच्छा आहे. पण जर निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दुसरीकडे विरोधकांनीही दंड थोपटले आहेत.

त्यामुळे बारामती आणि राहुरी येथे कोणता पक्ष विजयाची पतका फडकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कांटे की टक्कर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच बारामती विधानसभा निवडणुकींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Baramati- Rahuri By-Poll
५ राज्यातील विधानसभेचं आज बिगुल वाजणार, बारामतीमध्येही धुरळा उडणार, निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर

बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण बारामती पोटनिवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गट कुठलाही उमेदवार देणार नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे. पण राहुरीमध्ये जर निवडणूक झाली तर प्राजक्त तनपुरे आमच्याकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान पण दोन्ही निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र राहुरीबाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती अंकुश काकडे यांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणार उतरणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे भाजप आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.

या जागेवर भाजप घरातीलच एखाद्या सदस्याला उमेदवारी देत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढवणार की नवीन चेहरा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. दरम्यान शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा, असा प्रयत्न आहे. मात्र, जर ही निवडणूक लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढू, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com