TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

TMC-BJP Workers Clash In Kolkata : कोलकातामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.
TMC-BJP Workers Clash In Kolkata
ension escalated in Kolkata ahead of PM Modi’s rally as TMC and BJP workers clashed and stonessaam tv
Published On
Summary
  • पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी.

  • दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.

  • या घटनेत तृणमूल काँग्रेसचे मंत्री शशी पंजा जखमी झाले आहेत.

कोलकातामध्ये भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. तृणमूल काँग्रेसचे मंत्री जखमी झाले आहेत. तृणमूल काँग्रेसवर भाजप कार्यकर्त्यांना अडथळा आणल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यापासून रोखत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

TMC-BJP Workers Clash In Kolkata
Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

राज्यमंत्री शशी पंजा यांच्या घरावर दगडफेक

कोलकात्यातील या राड्यानंतर भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या राड्यामुळे गिरीश पार्क येथील राज्यमंत्री शशी पंजा यांच्या घरावर दगडफेक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रिगेड येथील बैठकीसाठी जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप टीएमसीनं केला आहे. गिरीश पार्कमध्ये मोर्चा काढत असताना तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर विटा फेकल्या. पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांना राज्यात त्यांची सत्ता हवी आहे. महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि तृणमूल काँग्रेसमधील भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे येथे सत्तांतर झाले पाहिजे अशी भाजपच्या नेत्यांची मागणी आहे. या पार्श्वभुमीवर बंगाल भाजपनं परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. ही परिवर्तन यात्रा १ आणि २ मार्च रोजी सुरू झाली होती.

TMC-BJP Workers Clash In Kolkata
Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

ही परिवर्तन यात्रा ४ मार्च रोजी बंगालमधील नऊ ठिकाणी गेली होती. परिवर्तन यात्रेचा समारोप १० मार्च रोजी झाला यात २५० हून अधिक विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा गेली. प्रवासाच्या शेवटी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कार्यकर्त्यांसाठी २०२६ च्या विधानसभा निवडणुकांची रूपरेषा सांगतील. त्याआधी जाहीर सभेला उपस्थित असलेल्या प्रत्येक पुरुष आणि महिलेने सांगितले की महिलांची सुरक्षा आणि बेरोजगारी हे या राज्यासमोरील मुख्य समस्या आहेत.

दुसरीकडे आज झालेल्या राड्यात मंत्री शशी पांजा जखमी झाले आहेत. मला विटा मारण्यात आल्या. भाजप गुंड नाही तर हत्यारं आहे. त्यामुळे हा हत्यारा पक्ष बंगालमध्ये परिवर्तन कसा घडवेल असा सवाल टीएमसीच्या मंत्र्यांनी केला आहे. राज्यमंत्री आणि टीएमसी नेते डॉ. शशी पांजा म्हणाले की, ५० पेक्षा जास्त टीएमसी कार्यकर्ते जखमी झाले आहेत. माझ्यावर दगडफेक झाली. भाजपचे नेते गुंड आहेत. त्यांनी भाजपचा बहिष्कार करा आशय असलेला बॅनर फाडला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com