Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Ravindra Chavan Warning BJP MLAs Assembly: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व भाजपचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्यांचे कान टोचले.
Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?
BJP Maharashtra President Ravindra ChavanSaam Tv
Published On

Summary -

  • रवींद्र चव्हाण यांनी अधिवेशनाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांचे कान टोचले

  • विरोधकांना हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला

  • आमदारांच्या उपस्थितीसाठी कडक नियम लागू करण्यात आले

  • भाजपचे सर्व आमदार आणि मंत्र्यांवर करडी नजर असणार

गणेश कवडे, मुंबई

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. या अधिवेशनाला भाजपचे अनेक आमदार गैरहजर राहत आहेत. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संतापले. रवींद्र चव्हाणांनी दांडीबहाद्दर आमदारांचे कान टोचले. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका असे म्हणत त्यांनी अधिवेशनाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांची शाळा घेतली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या हातामध्ये रिपोर्ट कार्ड ठेवलं.

यापुढे गैरहजर राहताना पक्षाला लेखी कारण द्यावे लागणार नाहीतर संसदीय कामकाज मंत्री कार्यवाही करणार असल्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिल्या. भाजप आमदार आणि मंत्री यांच्या विधीमंडळातील गैरहजेरीवरून रविंद्र चव्हाण चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता यापुढे सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून ते संध्याकाळी संपेपर्यंत सर्व आमदार आणि मंत्र्यांना सभागृहात बसावे लागणार आहे.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?
Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद वाढली, भाजप-ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

यापुढे भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांवर पक्षाची करडी नजर असणार आहे. सकाळी सभागृह सुरू झाल्यापासून सायंकाळी संपेपर्यंत सर्व आमदार आणि मंत्री यांना सभागृहात बसणं बंधनकारक असणार आहे. ५ आमदारांचा एक गट तयार करून एका आमदाराकडे या गटाची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित आमदार किती वेळ सभागृहातील कामकाजात सहभागी होतात? याचा रिपोर्ट गटाचा आमदार हा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांकडे देईल.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?
Maharashtra Politics: भाजप-मनसेची युती होताच राजकारण ३६० डिग्री फिरलं! सभापतीपद राज ठाकरेंच्या पक्षाकडे गेलं

तर, मंत्र्यांच्या कामकाजावर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वॉच असेल. सभागृहात अनुपस्थित राहण्यासाठी कुठलीही बैठक किंवा तत्सम महत्त्वाचे काम असेल तर संबंधित आमदार आणि मंत्र्याला तसे लेखी संयुक्तिक कारण हे पक्षाला सांगावे लागणार आहे. कुठलीही सबब न देता अनुपस्थित राहणाऱ्या करतीलावर पक्ष, तर मंत्र्यांवर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे आता भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना पक्षाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करावेच लागेल.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?
Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिवसेनेत करणार प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com