Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद वाढली, भाजप-ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Major Political Shift In Buldhana: बुलडाण्यात मोठी राजकीय घडामोड घडली. भाजप, ठाकरेसेना आणि राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद वाढली, भाजप-ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू

  • भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षप्रवेश केला

  • आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

  • बुलडाण्यातील चिखली मतदारसंघात शिंदेसेनेची ताकद वाढल्याची चर्चा

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत चालली आहे. शिंदेसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजप, शिवसेना ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी धनुष्यबाण हाती घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे चिखली मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून भाजपा पक्षांला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद वाढली, भाजप-ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाअध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण आले समोर

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले. या पक्ष प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे चिखली मतदारसंघात शिंदेसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

Maharashtra Politics: राज्यात शिंदेंची ताकद वाढली, भाजप-ठाकरेसेना अन् राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंनी डाव साधला, भाजपसह राष्ट्रवादी चीतपट; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com