रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...असाच एक व्हायरल व्हिडिओ आमच्या हाती लागलाय...भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मौलवींच्या पाया पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच चव्हाण मौलवींच्या पाया पडलेत का...? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं ?
BJP Maharashtra State President Ravindra Chavan taking blessings of a Sindhi spiritual leader during a public rally in Ulhasnagar.
BJP Maharashtra State President Ravindra Chavan taking blessings of a Sindhi spiritual leader during a public rally in Ulhasnagar.saam tv
Published On

या व्हिडिओत पाहा...भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भरसभेत मौलवींच्या पाया पडतायत असा दावा करण्यात आलाय...काही दिवसांपूर्वी अकोटमध्ये भाजप आणि MIMची युती झाली होती...त्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून, भाजपचे चव्हाण मौलवींच्या कसे पाया पडत आहेत हे दाखवण्यात आलंय...पण, खरंच भाजपच्या स्टेजवर मौलवी आलेयत का...? चव्हाण मौलवींच्या पाया पडलेयत का...? हा मौलवी MIMशी संबधित आहे का..? असे सवाल उपस्थित होतायत...

...हा व्हिडिओ आणि सोबत एक मेसेज व्हायरल होतोय...सध्या निवडणूक सुरू असल्याने हिंदू-मुस्लीम असा प्रचार सुरू आहे...त्यातच भाजपच्या स्टेजवर मौलवी आल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय...इतकंच नव्हे तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्या पाया पडत असल्याचं दिसतंय...यामुळे खरंच या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली...व्हिडिओ नीट पडताळून पाहिला...त्यावेळी या व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे याची माहिती मिळताच त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला...

चव्हाण पाया पडत असलेली व्यक्ती मौलवी नाहीत किंवा एमआयमचे नेतेही नाहीत

व्हिडिओत दिसणारे सिंधी समाजाचे धर्मगुरू

उल्हासनगरात छोटू हिंदू साईंचा वसनशाह दरबार भरतो त्यातील हे धर्मगुरू आहेत

सिंधी धर्मगुरूंचे देशभरासह परदेशात लाखो भक्त

फडणवीसांच्या उल्हासनगरच्या सभेत सिंधी धर्मगुरूंची उपस्थिती

उल्हानगरात फडणवीसांची 7 जानेवारीला सभा झाली...यावेळी हे सिंधी धर्मगुरू उपस्थित राहिले...याच दरम्यान रवींद्र चव्हाणांनी त्यांचे आशीर्वाद घेतले...मात्र, याच व्हिडिओचा वापर करत रवींद्र चव्हाण यांची बदनामी करण्यात आली हे स्पष्ट होतंय...आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी चव्हाण मौलवींच्या पाया पडल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com