महिलांसाठी मोफत बस सेवा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात घेतला मोठा निर्णय

Free Bus Travel Scheme For Women In Kerala From June 15: केरळ सरकारने सत्ता स्थापन करताच मोठा निर्णय घेतला असून 15 जूनपासून महिलांना केएसआरटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
Kerala Chief Minister V.D. Satheesan chairs first cabinet meeting announcing free bus travel for women and key reforms.
Kerala Chief Minister V.D. Satheesan chairs first cabinet meeting announcing free bus travel for women and key reforms.saam tv
Published On

काँग्रेस नेते व्हि.डी. सतीशन यांनी सोमवारी केरळम राज्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सतीशन यांच्यासह संपूर्ण 20 सदस्यांना मंत्रिमंडळाची शपथ दिली. शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत केरळम सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे 15 जूनपासून महिलांना केएसआरटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. यासह इतरही निर्णय घेण्यात आले आहे.

Kerala Chief Minister V.D. Satheesan chairs first cabinet meeting announcing free bus travel for women and key reforms.
Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

यामध्ये आशा सेविकांच्या मानधनात तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून ज्येष्ठ स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. तसेच 2023 मधील 'नव केरळ' यात्रा दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या चौकशीसाठी विशेष एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

Kerala Chief Minister V.D. Satheesan chairs first cabinet meeting announcing free bus travel for women and key reforms.
Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला गृहमंत्री

काँग्रेसने थिरुवंचूर राधाकृष्णन यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली असून शनिमोल उस्मान या उपाध्यक्ष असतील. 22 मे रोजी विधानसभा अध्यक्षांची औपचारिक निवड होणार असून 29 मे रोजी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचे शर्यतीत असलेले रमेश चेन्नीथला यांच्याकडे गृहखाते दिले आहे.

Kerala Chief Minister V.D. Satheesan chairs first cabinet meeting announcing free bus travel for women and key reforms.
Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

या शपथविधी सोहळ्यास काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियाका गांधी, माजी मुख्यमंत्री पिनारायी विजयन, भाजप नेते राजीव चंद्रशेखर तसेच काँग्रेससशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शपथविधीपूर्वी सतीशन यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हात उंचावून अभिवादन केले. सतीशन हे सलग सहाव्यादा पारावूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान मंत्रिमंडळात काँग्रेसचे 11 मंत्री आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com