Assembly Election: डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसची धावाधाव? डॅमेज कंट्रोलसाठी 'मातोश्री'वर चेन्नीथला

Assembly Election: काँग्रेस-ठाकरेंमधील वाद विकोपाला गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेस नेते 'मातोश्री'वर गेल्याचं सांगितलं जात आहे.
Assembly Election: डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसची धावाधाव? डॅमेज कंट्रोलसाठी 'मातोश्री'वर चेन्नीथला
ANI
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांना वेग आलाय. तर विदर्भातील 10 जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेलाय. त्याचे उग्र पडसाद महाविकास आघाडीच्या बैठकीत उमटायला लागले. एवढंच नाही तर तुटेपर्यंत ताणू नये, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना दिला.

त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी डॅमेज कंट्रोलसाठी आधी शरद पवार आणि त्यानंतर थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर या भेटीनंतर मविआची तब्बेत ठीक असल्याची मिश्किल टिपण्णी चेन्निथलांनी केलीय.. तर आघाडीत बिघाडी नसल्याचं राऊतांनी म्हटलंय.

महाविकास आघाडीत विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून मतभेद असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र कोणत्या जागांवर तिढा आहे? पाहूयात.

मविआत या जागांवर रस्सीखेच?

अर्जुनी मोरगाव

परळी

तुमसर

सिंदखेडा

दर्यापूर

गेवराई

उदगीर

रामटेक

चंद्रपूर

ऐरोली

बेलापूर

वर्सोवा

धारावी

भायखळा

Assembly Election: डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसची धावाधाव? डॅमेज कंट्रोलसाठी 'मातोश्री'वर चेन्नीथला
Maharashtra Politics: महायुतीकडून मविआची कॉपी? महायुतीचाही सीएमपदाचा फैसला निकालानंतरच; वाचा स्पेशल रिपोर्ट

मविआतील तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर राऊत आणि पटोलेंनी एकतेचं दर्शन घडवलंय. महाविकास आघाडीतील डॅमेज कंट्रोलसाठी वरिष्ठांनी लक्ष घातल्याने जागा वाटपाचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे विदर्भातील जागांवर ठाकरे गट माघार घेणार की काँग्रेस? याची उत्सुकता आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com