Mosaic Strategy : इराणची तिहेरी रणनिती, मदतीला मित्रदेशांचे ५ लाख सैनिक; अमेरिकेला घाम, मोझॅक स्ट्रॅटेजी काय आहे?

Iran US Israel war news : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणने ‘मोझॅक डिफेन्स’सह तिहेरी युद्धनीती अवलंबल्याची चर्चा आहे. आयआरजीसीला 31 युनिट्समध्ये विभागून प्रांतीय कमांडरांना स्वायत्त अधिकार देण्यात आले आहेत. मित्रदेशांतील प्रॉक्सी लढवय्ये सज्ज असल्याने मध्यपूर्वेतील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Mosaic Strategy
Mosaic Strategy Saam TV Marathi
Published On

Iran Mosaic Strategy : अमेरिका, इस्त्राईलच्या हल्ल्यांनी इराणला घेरले आहे. सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूने संतापलेल्या इराणने आता तिहेरी रणनिती आखली आहे. त्यामुळे शत्रूराष्ट्रांना घाम फुटणार आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...

अमेरीका-इस्त्राईलने इराणवर चार दिवसांपासून हल्ले सुरु केले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर संतापलेल्या इराणच्या लष्कराने '३-टप्प्यांची' युद्धनीती अवलंबली आहे. ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायल अडचणीत येऊ शकतात. त्यांच्यासाठी जमिनीवरील कारवाई सोपी होणार नाही. इराणने आपल्या संरक्षण धोरणात काय मोठा बदल केला आहे ते पाहूया...

  • मोझॅक डिफेन्स सिस्टीम अराजकतेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

  • या रणनीतीअंतर्गत IRGC ला 31 वेगवेगळ्या युनिट्समध्ये विभागण्यात आले आहे. एक तेहरानसाठी आणि उर्वरित 30 वेगवेगळ्या प्रांतांसाठी. प्रत्येक युनिटच्या कमांडरकडे सामरिक शक्ती असेल आणि ते स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र असतील.

  • हे कमांडर स्वतः ठरवू शकतात की क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन सोडायचे, गनिमी युद्धात सहभागी व्हायचे की अन्यथा युद्ध करायचे. त्यांना कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

  • इराणसाठी त्यांच्या मित्र देशातील पाच लाख प्रॉक्सी सैनिक म्हणजेच लढवय्ये तरुण तयार आहेत.

  • ज्यात 2 लाखाहून अधिक PMF सैनिकांचा समावेश आहे

  • लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्लाह गटाचे 30 हजार सैनिक इस्त्राईल, अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करू शकतात.

  • 25 हजाराहून अधिक हमास सैनिक इस्रायलमध्ये विनाश घडवण्यासाठी सज्ज आहेत.

Mosaic Strategy
India Iran relation : खामेनेईंच्या हत्येवर मोदी सरकार मौन का? सोनिया गांधींची टीका

इराणची रणनीती स्पष्ट आहे. प्रथम शत्रूला आंधळे करा, नंतर त्यांचे संरक्षण कमकुवत करा आणि शेवटी त्यांना मोठ्या हल्ल्याने पराभूत करा. या तीन टप्प्यांच्या योजनेला ब्लाइंड, डेप्लेट आणि ओव्हरव्हेल्म असे म्हणतात. इराण स्वस्त शस्त्रांनी महागड्या अमेरिकन संरक्षण प्रणाली संपवू इच्छितो.

Mosaic Strategy
बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी, पाहा व्हिडिओ

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर मोठे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, आयआरजीसी कमांडर आणि इतर अनेक वरिष्ठ नेते मारले गेले. इराणच्या अणुस्थळांवर, युद्धनौकांवर आणि दोन हजारांहून अधिक लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. म्हणून, इराणमधील प्रांतीय लष्करी अधिकाऱ्यांना स्वतःहून युद्ध करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वारंवार परवानगी घेण्याची गरज नाही. ही रणनिती इराणला युद्धात किती यश देते ते येत्या काही दिवसांत कळेलच.

Mosaic Strategy
३० रणरागिणींनी चालवलं फायटर जेट; इराणच्या लष्करी तळांची केली राखरांगोळी, व्हिडिओ पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com