India Iran relation : खामेनेईंच्या हत्येवर मोदी सरकार मौन का? सोनिया गांधींची टीका

Ayatollah Ali Khamenei assassination : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर भारत सरकारने मौन बाळगल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीव्र टीका केली आहे.

Sonia Gandhi : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून कोणतीही भूमिकेवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारचे या विषयावरील मौन हे 'तटस्थ' राहणे नसून, ते आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीतून पळ काढण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील लेखामध्ये सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, भारत ऐतिहासिक काळापासून अन्यायाविरोधात आणि शांततेसाठी ठाम भूमिका घेत आला आहे. मात्र, सध्याच्या काळात जगातील महत्त्वाच्या घडामोडींवर भारत सरकार गप्प बसणे चिंताजनक आहे. खामेनेई यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, अशा घटनांमुळे मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com